इंदापूर लघुपट मोहत्सव ला उत्स्फूर्त प्रतिसाद .

इंदापुर :इंदापुर येथे दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ,जयाद्री फिल्म प्रोडक्शन निर्मित, सुप्रजा मसाला यांच्या सहयोगाने इंदापुर मध्ये लघुपट महोत्सव सोहळा या स्पर्धेचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम कोरोनाचे सगळे नियम पाळून करण्यात आला ,या कार्यक्रमासाठी अनेक कलाकार मंडळी नेतेमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री संजय बाबा कोकाटे( शिवसेना नेते ) .तसेच उमेश पाटील (माढा तालुका भाजप अध्यक्ष)( बहुउद्देशीय संस्था )चे अध्यक्षा सुरेखा ताई पाटील .( युवा उद्योजक) सचिन पवार, अमोल यादव, तसेच (सिनेअभिनेत्री) मोनिका बंगाल, पूजा राठोड , मानसी पाचपुते, (प्राध्यापक) डॉक्टर. प्रफुल गायकवाड, प्रकाश ऋषी काळे. स्वप्नील नलवडे ,विजयकुमार हरिश्चंद्र ,सोनाजी पाटील (दंडम फिल्म अभिनेता )आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास विशेष सहकार्य रिंकू शेठ खिंवसरा,अहिंसा बॅन्जो चे सर्व सर्वाे पिंटू जगताप ,सुमित कुंभार, बंटी गोरे ,प्रशिक कांबळे यांचे लाभले.या कार्यक्रमासाठी राहुल सिनेमा इंदापूर चे मालक राहुल गुंडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले .या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद कांबळे यांनी केले होते . स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते .प्रथम मागील वर्षी या लघुपट महोत्सवाला प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाला होता, आणि आता दुसऱ्या वर्षांमध्ये या सोहळ्याला खूप मोठा प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या लघुपट महोत्सवांमध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक दिपाली भोसले सय्यद चारीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रेप या लघुपटाला 20000 व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. तसेच द्वितीय पारितोषिक जबाबदार कोण या लघुपटाला वीरा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने रोख रक्कम 15000 व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले .आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस सिंगल रूम या लघुपटाला प्राध्यापक प्रफुल्ल गायकवाड यांच्या वतीने देऊन त्यांना गौरवण्यात आले .यावेळी सिंगल रूम या लघुपटाचे निर्माता-दिग्दर्शक हनुमंत निमगिरे सर हे देखील सोहळ्यासाठी उपस्थित होते,गावाकडील ग्रामीण भागातील कलाकारांना हक्क आणि हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच आपण कमीत कमी वेळे मध्ये काहीतरी करून दाखवायची धमक असलेल्या जिद्द असलेल्या होतकरू कलाकारांसाठी हे मोठे व्यासपीठ आयोजक प्रमोद कांबळे यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे विशेष करावे तितके कौतुक थोडेच ,तसेच सध्या सर्वत्र कार्यरत असलेले दिपाली भोसले सय्यद चारीटेबल ट्रस्ट पाहिजे ती मदत करून कलाकारांना वाव देण्यासाठी ,कलाकारांसाठी काही तरी नवीन करण्याची धडपड या संस्थेच्या माध्यमातून प्रमोद कांबळे हे सातत्याने करत असतात ग्रामीण भागातील कलाकारांसाठी लघुपट महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कलाकार मंडळी प्रमोद कांबळे यांचे विशेष कौतुक करत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here