इंदापूर : इंदापूर येथील काँग्रेस भवन समोरील पुणे सोलापूर हायवेलगत 80 वर्षाची अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होती, ती विलास व्यवहारे यांनी पाहिलं व त्यानंतर संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कक्ष प्रमुख मंगेश चिवटे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली इंदापूर तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक आणि आरोग्य टीममधील आनंद केकाण, सागर आवटे, सोमनाथ लांडगे, पवनजी घनवट यांना संपर्क करून या सर्वांनी प्राथमिक उपचाराचे गरज असल्याचे समजताच सर्वांनी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे खिल्लारे मामा यांच्या सहकार्याने ॲम्बुलन्स मधून नेण्यात आले. व प्राथमिक उपचार सुरू करून त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क करून हे सर्व करून इंदापूर येथे माणुसकीचे दर्शन घडवून आणले. या सर्वांच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा वयोवृद्ध माणसाचा जीव वाचला. आजच्या धबधब्याच्या युगामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावना लोकांमध्ये कमी झालेली आहे त्यातच त्यामुळे माणुसकी आणि जिवंत आहे याचीच प्रचिती होते.
Home Uncategorized इंदापूर येथे वयोवृद्ध व्यक्तीचा जीव वाचवून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वैद्यकीय टीमने...