इंदापूर:आज नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांची इंदापूर तालुक्यातील सकल जैन समाज कमिटीतीच्या वतीने मिलिंद दोशी, संतोष व्होरा, डॉ.विकास शहा, वैभव दोशी, विपुल व्होरा, पुष्कर गांधी, सिद्धांत दोशी या सर्व प्रमुख लोकांनी भेट घेऊन बुधवार दिनांक 21 डिसेंबर रोजी इंदापूर येथे जाहीर निषेध मोर्चा आयोजित करणार असल्याबाबत माहिती देऊन निषेध मोर्चाच्या परवानगीची मागणी मागितली आहे.जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने याबाबतची अधिक माहिती घेतली असता जैन कमिटीतील लोकांनी असे सांगितले की,देशातील सकल जैन समाजाचे अतिशय सिद्धक्षेत्र म्हणून ओळख असलेले काशी श्री सम्मेद शिखरजी हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेले तिर्थकरांचे वंदनीय सिद्धक्षेत्र आहे.परंतु केंद्र सरकारच्या वन मंत्रालयाने सदरील क्षेत्र हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे आमचे श्रद्धास्थानावर व आमचेवर खूप मोठे धार्मिक संकट निर्माण झालेले आहे. आम्ही भगवंताची दैनंदिन पुजा, अभिषेक वगैरे विधीवत अतिशय पावित्र्याने करीत असतो. सदर सिद्धक्षेत्र दर्शनास भाविक हजारो किलोमीटर वरून येत असतात.असे असताना प्राचीन सिद्धक्षेत्रास पर्यटन क्षेत्र जाहीर केल्याने त्या ठिकाणी मांस, मद्य विक्री होईल व आमचे सिद्धक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येऊन आमचे श्रद्धास्थानावर त्याचा परिणाम होणार आहे. जैन धर्मीयांची काशी म्हणून त्याची ख्याती संपुष्टात येईल व आमचे सदर सिद्धक्षेत्रावरील भगवंतांचे मंदीर, मुर्ती यांस दर्शनास व अभिषेक, पुजा यांस बाधा पोहोचेल.यास्तव कृपया केंद्र सरकारने श्री सम्मेद शिखरजी सिद्धक्षेत्र (गिरीडीह) झारखंड याचा पर्यटन क्षेत्र जाहीर केलेचा निर्णय त्वरित परत घेऊन आमचे सिद्धक्षेत्राचे अस्तित्व कायम ठेवणेस विनंतीपूर्वक निवेदन देण्याकरिता आम्ही बुधवारी जाहीर निषेध मोर्चा काढत तहसीलदार इंदापूर यांच्या हस्ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पर्यंत आमच्या भावना पोहोचवणार आहोत असे कमिटीतील लोकांनी माहिती दिली.आणि याच कारणासाठी यास्तव आम्ही सर्व जैन समाज बांधव दिनांक २१/१२/२०२२ रोजी आमचे सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करीत आहेत.
भारतातील जैन समाज हा अतिशय शांतीमय समाज म्हणून ओळखला जातो या समाजातील बांधव गुण्यागोविंदाने व्यापार करीत असतात. कोणत्याही भानगडीत न पडणारा हा समाज आज तीर्थक्षेत्राचे पावित्र राखण्याकरिता रस्त्यावर उतरत आहे म्हणून केंद्र शासन याबाबत काय निर्णय घेईल हे येणारे दिवसात समजेल.
🏴 जाहीर निषेध मोर्चा हा जुन्या कचेरी शेजारील जैन मंदिरापासून मेन पेठ- खडकपुरा- पंचायत समिती- मार्केट यार्ड मार्गे नवीन तहसील ऑफिसला जाण्याचे नियोजित आहे.