इंदापूर येथील चिमुकला ‘साईश पवार’ साठी प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.कदम ठरले देवदूत.

इंदापूरचे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.एल. एस.कदम हे गोरगरीब रुग्णांसाठी नेहमीच सहकार्य करणाऱ्यांपैकी मानले जातात. साईश विकी पवार (मूळ गाव फलटण) वय अवघे 5 महिने या चिमुकल्यास जन्मताच उलटी चा त्रास होत होता. अनेक डॉक्टरांना याबद्दल दाखवले असता उलटी कमी होत नव्हती.आई वडील चिंतेत असतानाच त्यांना डॉक्टर एल एस कदम यांना एकदा दाखवा असा सल्ला साईश चे आजोबा इंदापूरचे शंकर धोत्रे यांच्याकडून मिळाला. डॉक्टर कदम यांनी या चिमुकल्यास तपासले असता पोटातील जठर नेहमीच डाव्या बाजूला असते पण या चिमुकल्याचे जठर हे छातीत लिव्हरच्या वर उजवीकडे फुप्फुसात विचित्र स्थितीत असल्याचे आढळून आले.अशा परिस्थितीत ऑपरेशन करणे हे खूप अवघड व गरजेचे होते. नातेवाईकांना विश्वासात घेऊन डॉक्टर एल एस कदम यांनी ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही असा सल्ला दिला व सर्व नातेवाईकांनी डॉक्टर कदम यांच्यावर विश्वास ठेवून शस्त्रक्रिया करण्यास मान्यता दिली. काल दिनांक 24 जून रोजी खूप कठीण व अति गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडण्यात डॉक्टर कदम व त्यांची सर्व टीम यशस्वी झाली. या यशस्वी झालेल्या शस्त्रक्रियेमुळे पवार कुटुंबिय व नातेवाईक यांना मनापासून आनंद झाला व त्यांनी डॉक्टर कदम यांचे आभार मानले. पवार कुटुंबीयांची हालाखीची परिस्थिती पाहता अतिशय माफक दरात डॉक्टर कदम यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.चिमुकला साईश पवार यांचे आजोबा शंकर धोत्रे हे भावी नगरसेवक मानले जाणारे अनिल अण्णा पवार यांचे निकटर्तीय आहेत. एवढी अवघड असलेली शस्त्रक्रिया यशस्वी व माफक दरात केल्यामुळे व गोरगरिबांना नेहमीच सहकार्य करत असल्यामुळे डॉक्टर कदम यांचा सत्कार ‘आमचे मेंबर’ अनिल अण्णा पवार मित्र मंडळ इंदापूर यांच्याकडून करण्यात आला. यावेळी लक्ष्मन धनवे धीरज धोत्रे, संजय (डोनाल्ड) शिंदे, विनोद हरणावळ, दत्तात्रय घाडगे, गोरख चौगुले युवराज दनाने,विजय भापकर,गणेश देवकर,सुनील सिधापूरे,पप्पू म्हेत्रे, हे सर्वजण उपस्थित होते.नेहमी मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे मुंबईचा रेफरन्स दिला जातो व शस्त्रक्रिया यशस्वी होईल का याचीही शंका निर्माण होते. अशा परिस्थितीत अत्यंत सामान्य कुटुंबात असलेल्या साईश ची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल वेगवेगळ्या स्तरातून डॉक्टर कदम यांचे अभिनंदन केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here