इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना 2024-25 ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. या संपूर्ण कार्यकारिणीची सोनाई पॅलेस येथे भेट घेतली. कार्यकारणीवर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या. इंदापूर बार असोसिएशनचे काम कौतुकास्पद असून कोणत्याही गट तट विना हे कामकाज चालू आहे व या संघटनेमुळे समाजातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम होत असल्याने इंदापूर बर असोसिएशन चा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने यांनी केले पुढे ते म्हणाले की आगामी काळात इंदापूर बार असोसिएशनला लागेल ती मदत करायला मी स्वतः व सोनई परिवार कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले. या सत्कार समारंभाला युवा नेते प्रवीण भैया माने सुद्धा उपस्थित होते ते म्हणाले की “इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी,कामगार,यांना खऱ्या अर्थाने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून भारतीय राज्यघटनेनुसार त्याला न्याय देण्याची भूमिका ही आपल्या तालुक्यातील प्रत्येक वकील करत असतो आणि आज पर्यंत या आपल्या इंदापूर तालुका बार असोसिएशनचे काम हे अधोरेखित करण्यासारखे आहे त्यामुळे मी इंदापूर बारच्या कार्यप्रणाली बाबत प्रभावित झालो आहे” असे युवा नेते प्रवीण भैय्या माने म्हणाले. अध्यक्षपदी निवड झालेले ॲड. गिरीश शहा साहेब, उपाध्यक्ष ॲड. भारत कडाळे साहेब व ॲड. शरद घोगरे साहेब, सचिव ॲड. योगेश देवकर साहेब, खजिनदार ॲड. सोमनाथ फुलसुंदर साहेब, ग्रंथपाल ॲड.भालचंद्र कुलकर्णी साहेब, महिला प्रतिनिधी ॲड. तेजस्वी वीर मॅडम, सदस्य ॲड. आप्पासाहेब शिंदे साहेब यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपाध्यक्षपदी निवड झालेले ॲड. माधवराव शितोळे देशमुख, वनसंरक्षक पुरस्कार विजेते ॲड. सचिन राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह आप्पा पाटील, कार्यध्यक्ष महारुद्र बाप्पू पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोलशेठ भिसे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय अध्यक्ष सागर बाबा मिसाळ,ॲड. कृष्णाजी यादव, ॲड. मनोहर नाना चौधरी व इंदापूर बार असोसिएशनचे अन्य सदस्य उपस्थित होते.