इंदापूर बाजार समितीचे मुख्य बाजार इंदापूर येथे हमीभावात आधारभुत दरात शासकीय मका खरेदी केंद्र सुरु केलेले असुन त्यासाठी शेतकऱ्यांनी हमीभावात मका विक्रीसाठी इंदापूर वाजार समितीचे मुख्य कार्यालय इंदापूर येथे नोंदणी सुरु केलेली असुन शेतकऱ्यांनी मका नोंदीचा ७ – १२, बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स व मोबाईल नंबर यासह नोंदणी दि. ३१/०५/२०२३ पर्यंत करणेत यावी असे आवाहन सभापती श्री. विलासराव माने यांनी केलेले आहे.तसेच समितीचे मुख्य व उपबाजारात भुसार शेतमाल आवक वाढली असुन या सप्ताहात इंदापूर येथे ११३०० बॅगची भुसार शेतमाल आवक झाली. यामध्ये ज्वारी, गहू, मका वगैरे शेतमाल इंदापूर व लगतचे तालुक्यातुन तसेच विशेषतः ज्वारी माढा, करमाळा, परांडा, उस्मानाबाद, माण, खटाव येथुन विक्रीस येते. या सप्ताहात ज्वारी प्रति क्विंटल रु. ३१००/- ते ४५११/- दराने विक्री झाली.बाजार समितीने शेतमालास चांगला दर मिळावा या उद्देशाने इंदापूर मार्केटमध्ये धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली असुन प्रति तास ५ मे. टन क्षमतेने धान्य सफाई केली जाते. याचा फायदा शेतमाल बांधवांनी घ्यावा. तसेच शेतमाल तारण योजनाही बाजार समिती राबविते.मुख्य व उपबाजारांचे ठिकाणी बाजार समितीने ६० मे. टन व शिवलिलानगर इंदापूर येथे ८० मे. टन क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असुन त्याची २४ तास सेवा उपलब्ध आहे.शेतकरी बांधवांनी बाजार समितीचे विविध योजना व उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती श्री. विलासराव माने, उपसभापती श्री. रोहीत मोहोळकर यांनी केलेले आहे. यावेळी संचालक मा. आप्पासाहेब जगदाळे, आमदार श्री. यशवंत (तात्या) माने, श्री. दत्तात्रय फडतरे, श्री. मधुकर भरणे, श्री. संग्रामसिंह निंबाळकर, श्री. मनोहर ढुके, श्री. संदिप पाटील, सौ. रुपाली संतोष वाबळे, सौ. मंगल गणेशकुमार झगडे, श्री. आबा देवकाते, श्री. तुषार जाधव, श्री. संतोष गायकवाड, श्री. अनिल बागल, श्री. दशरथ पोळ, श्री. रौनक बौरा, श्री. सुभाष दिवसे व सहा. सचिव श्री. वैभव दोशी उपस्थित होते.