इंदापूर बाजार समितीचे भव्य असा इंदापूर कृषी महोत्सव २४ जानेवारी पासून..पशु-पक्षी,जनावरे,मत्स्य प्रदर्शन,डॉग शो,घोडे बाजार आणि बरेच काही..

इंदापूर बाजार समितीचे इंदापूर कृषी महोत्सव २४ जानेवारी पासून.सभापती विलासराव माने यांची माहिती ; पाच दिवस चालणार कृषी प्रदर्शन
इंदापूर : इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, शिवलिलानगर डाळींब मार्केट मध्ये इंदापूर कृषी महोत्सव २०२४ चे आयोजन ( बुधवार दि. २४ ते रविवार दि. २८ जानेवारी २०२४) दरम्यान पाच दिवस पशु-पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच पुणे जिल्हातील एकमेव घोडे बाजाराचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेले आहे. कृषी प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर, आमदार यशवंतराव माने व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
याबाबत इंदापूर कृषी बाजार समितीच्या कार्यालयात मंगळवार ( दि. ९ ) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार समितीचे संचालक दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मनोहर ढुके, संदिप पाटील, सौ. रुपालीताई संतोष वाबळे, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे व प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.
कृषी प्रदर्शन व घोडे चाल स्पर्धा उद्घाटन समारंभ बुधवार दि. २४ रोजी दुपारी ३ वाजता मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे माजी सभापती व संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तर कृषी प्रदर्शन समारोप, बक्षीस वितरण समारंभ संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे शुभहस्ते, माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. २८ रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न होणार आहे.


बाजार समितीचे इंदापूर कृषी महोत्सवात, कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे-साधने, ऑटो मोबाईल्स, गृहउपयोगी आवश्यक वस्तु तसेच शेती व कृषी अनुशंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे कृषी प्रदर्शन २५० स्टॉल, ५० खाद्य स्टॉल, पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजार तसेच घोडे चाल (रवाल), नाचकाम स्पर्धा शिवाय स्मार्ट घोडे नर-मादी, नुकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण आहे.


“डॉग शो” प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरुष-मुलांसाठी महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम तसेच मुली-महिलांसाठी सौ. मोनाली करंदीकर यांचा “फुल टु धमाल” व “खेळ पैठणीचा” हा सुप्रसिद्ध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लहान व प्रोढांसाठी “मनोरंजनाचे खेळ” व खवय्यांसाठी “खाऊगल्ली” असे शिस्तबद्ध नियोजन केले जाणार आहे.


शालेय विद्यार्थ्यां व नागरिकांसाठी मोफत बस सेवा:इंदापूर येथील नवीन बाजार समितीमध्ये आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून, इंदापूर शहरातील १०० फुटी रोड येथील नविन प्रशासकीय इमारती पासून विद्यार्थी व नागरिकांसाठी दि. २४ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत मोफत बससेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर कृषी प्रदर्शनात नामांकित कंपनीचे शेती साधने, उत्पादने वगैरे शेतीचे स्टॉल उभारणी काम युटिलिटी इन्हेंटचे रणजीत पांडे करणार आहेत.


स्टॉल नोंदणीसाठी शंकर शिंदे यांना ९०९६३५५५४१/ ७५६४९०९०९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here