इंदापूर पोलिसांची दबंग कामगिरी.. ८ बेकायदेशीर दारू निर्मिती ठिकाणे उद्‌ध्वस्त..व्वा रे..इंदापूर पोलीस..

इंदापूर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही असामाजिक घटना घडू नये म्हणुन इंदापूर तालुक्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागलेली दिसत आहे.
इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने अवैद्य बेकायदेशीर हातभट्टी दारू बाबत गोपनीय माहिती मिळण्याचा कार्यक्रम पोलीसांनी हाती घेतला होता आणि त्याच अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना ८ ठिकाणी बेकायदेशीर दारू निर्मिती संदर्भात माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ असे मिळून प्रोहिबिशन रेड पथक रवाना केले. सदर पथकाने आज दि.०९/१२/२०२२ रोजी पहाटे सहा वाजता बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ८ जणावर रेड करून मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे बॅरल ०५ नग , दोनशे लिटर १२ नग, शंभर लिटर ०१ नग व इतर साहित्य असा एकूण २२८००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आठ जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र येथे सुरू आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के बी शिंदे, युवराज कदम, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस हवलदार मनोज गायकवाड, पोलीस नाईक सलमान खान, अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, महिला पोलीस नाईक मुजावर, पोलीस शिपाई विकास राखुंडे, दिनेश चोरमले यांनी मिळून केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here