पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या नेतृत्वाखाली तीन ते चार महिन्यात चौथी मोठी कारवाई.
इंदापूर: (प्रतिनिधी निलेेश भोंग): दि 18 रोजी पहाटेच्या दरम्यान इंदापूर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून 30 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सोलापूरच्या बाजूने पुणे बाजूस जाणारा आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक KA -01 AL – 9121 जात असताना पहाटेच्या वेळास इंदापूर पोलीस गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी संशयित आयशर टेम्पोची तपासणी केली असता इंदापूर पोलिसांना त्यात अवैधरित्या मानवी जीवनात अपायकारक ठरणाऱ्या व शासनाने बंदी घातलेला आर. के. कंपनीचा गुटखा आढळून आला. यामध्ये इंदापूर पोलिसांनी गाडी ड्रायव्हर व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असून इंदापूर पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या नेतृत्वाखाली अवैद्य गुटख्यावर तीन ते चार महिन्यात चौथी मोठी कारवाई आहे.यामध्ये पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक पाडूळे, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस नाईक मोहम्मद अली मडी, पोलीस नाईक मोहोळे, पोलीस नाईक मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल राखुंडे, महिला पोलीस हवालदार खंडागळे आदी उपस्थित होते.