इंदापूर: आज सकाळी इंदापूर येथील महात्मा फुले शॉपिंग सेंटर मधील तब्बल 17 गाळा धारकांचे गाळे नगरपालिकेने सील केले आहेत. दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम थकबाकी असलेल्या गाळाधारकांची गाळे सील झालेलेची माहिती यावेळी मिळाली.
या 17 सील केलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये प्रामुख्याने 6 महसुली कामकाज करणारे स्टॅम्प विक्रेते, टायपिंग कामे व वेगवेगळ्या पद्धतीची करारनामे बनवण्याची कामे चालली जातात त्यातच नगरपालिकेने हे गाळे सील केल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही याचा त्रास होत आहे व इतरही 11 व्यापाऱ्यांचे गाळे सील केली आहेत त्यामुळे एकूण 17 व्यापाऱ्यांचे धंदे अडचणीत आले आहेत.
याबाबत इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राम कापरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या गाळधारकांची थकबाकी ही दोन लाखांपेक्षा अधिक असून वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकबाकी भरली नसल्याने आम्ही सदरची कारवाई केली. या गाळाधारकांनी थकबाकी भरल्यानंतरच ते सील काढले जाईल अन्यथा सदरचे गाळे जप्त करून त्यांचे फेर लिलाव घेणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी राम कापरे यांनी दिली.
एकूणच महात्मा फुले शॉपिंग सेंटर मधील ही कारवाई एक प्रकारे अन्यायच आहे असे काही गाळधारकांनी सांगितले कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य असून नगरपालिकेने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. थकबाकी भरण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा होता तो मिळाला नाही त्यामुळे ही कारवाई ही आमच्यावर अन्यायकारक आहे असे मत काही गाळाधारकांनी यावेळी व्यक्त केले.
Home Uncategorized इंदापूर नगरपालिकेची मोठी कारवाई: तब्बल 17 गाळे केले सील. नगरपालिकेच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांची...