इंदापूर: इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने पाणी घरपट्टीचे व्याज, पाणीपट्टीचे व्याज, घरकुले, गरिबाच्या घरावरील घनकचरा या व इतर सत्तावीस प्रश्नावर 27 मार्च 2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला 25 मे 2023 रोजी 60 दिवस पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने नगरपालिका मैदानात संघर्ष समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.आंदोलनकर्त्यांच्या मते गेल्या 60 दिवसात आंदोलनाची दखल न घेता या आंदोलनाकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे.इंदापूरकरांवर अवाजवी व्याज, शासकीय दंड, घनकचरा, घरकुले प्रश्नाच्या आधारावर होणारी पिळवणूक यासाठी संघर्ष समिती आंदोलन करीत आहे.दुर्लक्षित नगरपालिकेचे लक्ष वेधण्याकरिताबकाल साठाव्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अनोख्या आंदोलनाची सुरुवात झाली.यामध्ये गांधीगिरी पद्धतीने धरणेमंडपामध्ये प्रशासनाची खुर्ची प्रस्थापित केली या खुर्चीला शिवा ग्रुपचे अध्यक्ष माजी नगरसेवक अतुल शेटे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घातला जमलेल्या शेकडो नागरिकांनी मागण्याची निवेदनाची पत्रके हातात घेऊन त्या खुर्चीला वाहिली या खुर्चीला प्रशासनाची खुर्ची,मुख्याधिकाऱ्याची खुर्ची असे संबोधले आणि त्या खुर्चीला इंदापूरकरांचे प्रश्न ऐकवले.इंदापूर नगरपालिकेच्या दरवाजामध्ये नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून जेष्ठ नागरिक 80 वर्षाचे अर्जुन संभाजी शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प वाहून नगरपालिकेच्या दरवाज्याची प्रतिकात्मक पूजा करण्यात आली.नागरिकांनी त्या दरवाज्यावर पुष्प वाहिले त्यानंतर हे सर्व नागरिक इंदापूर नगरपालिकेत गेले.नगरपालिकेमध्ये एका खुर्चीची प्रशासनात्मक दृष्ट्या स्थापना केली व ती खुर्ची सरकारची,नगरपालिकेची खुर्ची आहे असे संबोधून सेवानिवृत्त मिलिट्री मेजर महादेव सोमवंशी यांच्या हस्ते त्या खुर्चीला पुष्पहार घालण्यात आला.त्यानंतर इंदापूर नगरपालिकेने नागरिकांची घरपट्टी वाढवण्यासाठी पंचवार्षिकेची तयारी सुरू केली आहे त्या पंचवार्षिकीला विरोध करण्यासाठी नगर नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्याचे प्रतिनिधी यांना निवेदन देऊन घरपट्टीचे व्याज, पाणीपट्टीचे व्याज, शासकीय दंड, गाळे धारकाचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, शासकीय जमिनीवर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या नावावर जागा व्हाव्यात हा प्रश्न हे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय व निवेदनातील 27 प्रश्न सुटल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पंचवार्षिकी किंवा घरपट्टी वाढ लागू करू नये व लादल्यास त्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल अशा आशियाची निवेदन देण्यात आले.यावेळी नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी जागेवरती जाऊन गुलाब पुष्प दिली. यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये अन्यायी व्याज व इतर प्रश्नाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला 60 दिवस झाले आमचा विचार केला नाही अशी भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली.यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे सर,अतुल शेटे पाटील(माजी नगरसेवक इंदापूर न.पा),महादेव सोमवंशी,हमीद भाई आतार,महादेव चव्हाण सर,संदिपान कडवळे, अशोक देवकर,बाळासाहेब क्षिरसागर,सागर गानबोटे,संतोष भाऊ जामदार,प्रदीप भाऊ पवार,शंकर हुबाळे सर, फकीरभाई,अशोक ननवरे,विकास ताटे,अविनाश कोतमिरे,संजय सणगर,अशोक माने,बापू गायकवाड,नंदकुमार खरवडे,वसंत जाधव,आकाश ताटे,वसीम मोमीन,समीर मोमीन,इनोस मोमीन,अर्जुन शिंदे,त्रिभुवन झगडे,सुभाष गाडे,अशोक भाऊ पोळ,समद सय्यद,गोपी होनराव,अविनाश ठोंबरे इत्यादी उपस्थित होते.
Home Uncategorized इंदापूर नगरपालिकेत प्रशासनात्मक खुर्चीस हार घालून व अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन इंदापूर...