इंदापूर नगरपालिका हद्दीतील मतदारांमध्ये २५०० मतदार बोगस, शासनाने 8 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा अमरण उपोषण करणार-अँड. राहुल मखरे.

इंदापूर : इंदापूर नगरपालिकेत तब्बल अडीच हजार बोगस मतदार असल्याचा घणाघात राहुल मखरे यांनी केला त्याचप्रमाणे गल्ली आणि वार्ड प्रमाणे याद्या फायनल व्हाव्यात बोगस व मयत मतदारांची नावे कमी व्हावीत या व इतर कारणासाठी इंदापूर नगरपालिकेत समोर बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे या धरणे आंदोलनना मध्ये प्रमुख आठ मुद्द्यांच्या मागण्या असून या प्रमुख आहेत मागण्या मंजूर न झाल्यास सहा डिसेंबर पासून अमरण उपोषण करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या प्रमुख 8 मागण्या खालील प्रमाणे:-
१) अनुकंपा/वारस तत्वानुसार आंदोलनकर्त्या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. 2) इंदापूर नगरपरिषद हद्दीतील सुमारे २ ते २.५ हजार नावे बोगस आहेत ते काढण्यात यावीत.
३) मतदार ज्या ठिकाणचा रहिवासी आहे. त्याचे नाव त्याच मोहल्ला (गल्ली) मध्ये ठेवण्यात यावे रहिवासी एका वार्डात मतदार यादी मध्ये नाव दुसऱ्या वार्डात असे मतदार यादी मध्ये दिसून येत आहे. त्याची दुरुस्ती करावी
४) ग्रामपंचायती मधील ज्या लोकांची नावे इंदापूर नगरपरिषदेच्या मतदार यादीतील नावे कमी करण्यात यावे तसेच निवडणूक आयोगाची फसवणूक केल्यामुळे गुन्हे दाखल करावेत
५) इंदापूर नगरपरिषदे मधुन स्थलांतरीत रहिवासी लोकांची नावे कमी करण्यात यावीत.
६) मयतांची नावे मतदार यादी मध्ये आजही तसेच दिसुन येतात ती नावे कमी करण्यात यावीत.
७) बोगस नावे लावण्या मध्ये साई एजन्सीज जालना या कंपनी चा डाटा एंन्ट्री ऑपरेटर सोमनाथ माने यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
८) बि.एल.ओ. यांच्या माध्यमातुन सर्व मतदार याद्यांचे दुरुस्ती(शुद्धीकरण) करण्यात यावे याकरिता बहुजन मुक्‍ती पार्टी दि.२४/११/२०२१ ते ०५ डिसेंबर २०२१ धरणे आंदोलन व दि. ०६ डिसेंबर २०२१ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे राष्ट्रीय महासचिव असलेले बहुजन मुक्ती पार्टी चे अँड. राहुल मखरे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बोलताना सांगितले. ये उपोषणास अँड. राहूलजी मखरे  संजय(डोनाल्ड) शिदे, संतोष क्षिरसागर, नागेश भोसले, आजाद(गौस) सय्यद, रोहित ढावरे, अँड. किरण लोंढे, अँड. सुरज मखरे आदी कार्यकर्ते बसल्याचे दिसून आले..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here