👉 प्रभारीपदी निवडीबद्दल मारुती वनवे व सहप्रभारीपदी निवडीबद्दल गोरख शिंदे यांचा सत्कार
इंदापूर: प्रतिनिधी दि.6/8/22
इंदापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकी संदर्भात शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक इंदापूर अर्बन बँक सभागृह शनिवारी (दि.6) उत्साहात संपन्न झाली. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली इंदापूर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा पुन्हा फडकविला जाईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे, त्याचा फायदा निवडणुकीत भाजपला होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांचे अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व आपणास लाभले आहे. आगामी नगरपरिषदेची निवडणूक सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एकजुटीने लढविण्यात येईल, असे बैठकीत मार्गदर्शन करताना नगरपरिषद निवडणुकीचे भाजप प्रभारी मारुती वनवे व सहप्रभारी गोरख शिंदे तसेच सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नमूद केले. बैठकीच्या प्रारंभी प्रभारीपदी निवडीबद्दल मारुती वनवे व सहप्रभारीपदी निवडीबद्दल गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.या बैठकीला भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, धनंजय पाटील, अशोक इजगुडे, शेखर पाटील, रघुनाथ राऊत, कैलास कदम, पांडुरंग शिंदे, प्रशांत उंबरे, आदिकुमार गांधी, जगदीश मोहिते, मेघश्याम पाटील, बंडा पाटील, सुनिल अरगडे, संदीप पाटील, सचिन जामदार, शुभम पवार, सागर गानबोटे, गुड्डू मोमीन, गणेश पाटील, धीरज शहा, शिवराज भिसे, ललेंद्र शिंदे, बापू भोसले, शेरखान पठाण, संतोष देवकर, अशोक खेडकर, अमित जौजाळ, अमोल राऊत, अमोल माने, नितीन मखरे, अजिंक्य जावीर, अभिजीत अवघडे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.