इंदापूर तालुक्‍यात मका काढणी साठी हार्वेस्टर ला पसंदी. हार्वेस्टर मुळे काढणी खर्चात मोठी बचत.

इंदापूर तालुक्यातील बागायत भागात मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागात मका पिकास एव्हरेज ही चांगलं मिळत असते.त्यामुळे या भागात मका पिकाकडे शेतकऱ्यांची पसंदी राहते. मकेला दरही चांगला मिळत असतो तसेच शेतकऱ्यांच्या गुरांसाठी चारा म्हणूनही मकवणाचा उपयोग होत असतो.मका पिकाच्या काढणीसाठी मजुरी ही मोठ्या प्रमाणात जाते त्यामुळे उत्पन्न खर्च वाढत असतो. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे नाहीत अशा शेतकऱ्यांनी आता मका काढण्यासाठी हार्वेस्टर ला पसंती दिलेली आहे .विशेष म्हणजे या हार्वेस्टर च्या काढणीला खर्च कमी लागतो व मकवाना चा उपयोग खत म्हणून होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हार्वेस्टर चा वापर करावा असे मत वडापुरी येथील प्रसिद्ध बागायतदार व हार्वेस्टर मालक हरिभाऊ माने यांनी व्यक्त केले.
📲 हार्वेस्टर साठी संपर्क: 9860486453 हरिभाऊ माने
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here