तावशी: इंदापूर तालुक्यात चारी बाजूने चौफेर फटकेबाजी करत विकासकामांचा स्कोअर बोर्ड धावता ठेवण्याचे काम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे करत असल्याचे दिसून येते.अतिशय नियोजनबद्ध फलंदाजी करत मैदानाच्या चौफेर विकासकामांचे फटकेबाजी करत इंदापूर तालुक्यातील प्रेक्षकांना कधी नव्हता तेवढा विकासाचा स्कोअर पाहायला मिळत आहे.
आज दि.18 रोजी सायंकाळी 6 गोखळी, तरंगवाडी येथील 8 कोटी 75 लाख रुपयांच्या भरघोस विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रमानंतर उद्या तावशी भागात 12 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन आयोजित केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस भवन इंदापूरकडून मिळली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन झाले आहे आता तावशी मध्येही 12 कोटी 50 लाखाच्या विकासकामांचे उद्घाटन होत असल्याने तावशी पंचक्रोशीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्या होणार्या उद्घाटन कार्यक्रमात तावशी ते उदनवाडी ते थोरातवाडी हा प्रामुख्याने रस्ता करण्यासाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा कामाचे उद्घाटन आहे. त्याचप्रमाणे तावशी भवानीनगर रस्ता 2 कोटी रु., तावशी सपकाळवाडी ते सणसर 45 लाख रुपये, तावशी- जाधव वस्ती ते थोरात वस्ती 5 लाख रु. अशा प्रकारे 12 कोटी 50 लाख रुपयांच्या भरघोस कामाचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तामामा यांच्या हस्ते होणार आहे. हे सर्व उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा तावशी येथे होणार आहे.
उद्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख प्रदीपदादा गारटकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, माजी सभापती प्रवीण भैय्या माने,छत्रपतीचे चेअरमन प्रशांतदादा काटे,pdcc चे संचालक संभाजी नाना होळकर, तालुकाध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, व्हाईस चेअरमन अमोल पाटील, सचिन दादा सपकाळ, रणजीत भैय्या निंबाळकर, रसिक आबा सरक, डॉ कमलाकर व्होरकाटे, शुभम भैय्या निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.
एकूणच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ओपनिंग बॅटिंग चालू झाल्यापासून विकासकामांचा स्कोअर वाढतच असून आणखी तालुक्यातील बऱ्याच विकासकामांचे उद्घाटने होणार असल्याने आत्तातरी राज्यमंत्री दत्तामामा विकासकामांची नॉट आऊट बॅटिंग करत चौफेर फटकेबाजी करत आहेत.