गावच्या व पंचक्रोशीतील गावांचा विकासासाठी राष्ट्रवादी हाच पर्याय- दादासाहेब भांगे.
इंदापुर: गावच्या व पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलोय आणि राष्ट्रवादीनेही माझ्यावर तालुका संघटक म्हणून जबाबदारी दिली आहे ती मी यशस्वी रित्या पार पाडेल असे मत नुकतेच बीजेपी मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले दादासाहेब भांगे यांनी अवसरी मध्ये केले .अवसरी गावांमध्ये त्यांचा सत्कार समारंभ भ्रष्टाचार विरुद्ध जनशक्ती चे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री हनुमंत घोडके यांनी ठेवला होता. त्याप्रसंगी श्री दादासाहेब भांगे बोलत होते. श्री हनुमंत घोडके हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आहेत ,त्यांचाही सामाजिक कामात मोठे योगदान आहे. याप्रसंगी नितीन दादा जगताप व धनाजी नाना तांबिले यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना दादासाहेब भांगे म्हणाले गेली 35 वर्षापासून मी विरोधकांसोबत होतो पण माझ्या गावाचा व गावाशेजारील कोणत्याच गावाचा विकास झाला नाही. आणि इथून पुढे होऊ शकणार नाही असे मला वाटले, आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे ठरवले. श्री दादासाहेब भांगे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका संघटक झाल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या गावामध्ये त्यांचा सत्कार समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत. तालुक्यातील दांडगा संपर्क असल्याने राष्ट्रवादीलाही यामुळे फायदा होईल असे चित्र निर्माण झाले आहे. अवसरी मधील सत्कार समारंभासाठी श्री नितीन दादा जगताप-अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य, श्री धनाजी नाना तांबिले सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस ,तसेच अवसरी मधील प्रगतशील बागायतदार भालचंद्र मोरे ,माजी पोलीस अधिकारी जयसिंग जाधव ,पैलवान श्री शरद शिंदे, बाळू जाधव ,सोमनाथ पेंडवळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कांबळे, युवराज गायकवाड, अवसरी पाणी पुरवठा संस्थेचे संचालक श्री दिनेश शिंदे ,देविदास घोडके ,इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र मोरे यांनी केले.