इंदापूर तालुक्यात ‘झेंडू बाम रोड’ नंतर ‘शापित रस्त्या’ची चर्चा.. शासनाची वर्कऑर्डर होऊन ६ महिने झाले तरी काम सुरूच नाही.. इंदापूर तालुक्यातील या एका रस्त्याला ‘शापित रस्ता’ का म्हणतात?..काय आहे प्रकरण वाचा..

ठेकेदाराला जादा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे कामाचा लोड झालंय का? ग्रामस्थांना पडला प्रश्न.
सरकार गतिमान म्हणून बोलले जाते पण वास्तवात काय आहे चित्र?.
ठेकेदारांवर शासनाचे नियंत्रण राहिले आहे का?
बावडा: इंदापूर तालुक्यात कधी नव्हे तेवढा रस्त्यांचा विकास झाला. अनेक गावोगावी खेडोपाडी डांबरीकरण होऊन दळणवळण सोपे झाले परंतु इंदापूर तालुक्यात दोनच असे रस्ते आहेत ज्या रस्त्यांची भरपूर चर्चा चालू आहे पहिला तर “झेंडू बाम रोड” जो अवसरी-वडापुरी या गावांना जोडणारा रस्ता आहे. तर दुसरा महत्त्वाचा रोड ज्याला “शापित रोड” म्हणून ग्रामस्थ संबोधतात त्याचं कारणही तसंच आहे भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक वेळा नारळ फोडून सुद्धा हा बावडा ते शेटफळ हवेली आणि तिथून निमगावला जाणार रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे. स्वतंत्र काळानंतर पहिल्यांदाच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या काळात हा रस्ता मंजूर झाला व या रोडला निधी पडला परंतु अद्याप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला नाही. वास्तविक पाहता शासनाने 11 जुलै 2023 रोजी काम सुरू करण्याचे कळवले होते आणि तसा बोर्डही या रस्त्यावर लावण्यात आलेला आहे. आता ६ महिने होऊन गेले तरी सुद्धा कामाला काय हात लागलेला नाही काही तज्ञांचे मत असं आहे की शासनाचा आदेश झाल्यानंतर १५ दिवस ते ३० दिवसांमध्ये कामाला सुरुवात झाली पाहिजे परंतु अद्याप कामाला सुरुवात झाली नाही म्हणून आता तो शापित रस्ता पुन्हा एकदा शापित राहतोय का अशीच चर्चा आता सध्या चालू आहे.६ महिन्यांपूर्वी या शापित रस्त्याचे काम चालू करण्यापूर्वी ठेकेदाराने माहिती फलकाचा बोर्ड लावला आहे पण मग काम का चालू नाही? अशा ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाची, लोकप्रतिनिधीची काही उपाययोजना आहे की नाही? ठेकेदाराला जादा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे कामाचा लोड तर झाला नसेल ना?असाच प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
मुळात बावडा ते शेटफळ हवेली मार्गे निमगाव केतकी हा महत्त्वाचा रोड म्हणजेच बावड्यातून निमगाव केतकी ला जाणारा हा शॉर्टकट रोड आहे. परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अद्याप पर्यंत या रोडवर अजूनही डांबर पडले नाही या रोडवरून रोज शाळकरी मुले, शेटफळ हवेली, बोकुडदरा, भोडणी निमगाव केतकी या गावातील शेतकऱ्यांची आवक जावक असते त्याचप्रमाणे निराभिमा कारखान्याला व इतरही कारखान्यांना याच मार्गे ऊस नेहला जातो. सद्यस्थितीत या रस्त्याची दुरावस्था खूप झाली आहे याचा त्रास वयोवृद्ध आणि रुग्णांना होत आहे.त्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टरला जर कामाचा लोड झाले झाला असेल किंवा काम करायचे नसेल तर शासनाने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करून त्वरित काम चालू करावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी अधिकाऱ्याला फोन केला असता संबंधित शासकीय अधिकाऱ्याने दोन दिवसात काम चालू करणार असे सांगण्यात आले. नितीन शिंदे यांचे संपर्क साधला असता ते म्हणाले की,”आम्ही त्यांना ८ दिवसाची मुदत देतो परंतु जर काम चालू झाले नाही तर मात्र शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करणार आहोत”असे नितीन शिंदे म्हणाले.
एकंदरीतच अनेक वेळा नारळ फुटल्यानंतर गेले १५० वर्ष खितपत पडलेला हा शापित रस्ता लवकरात लवकर चालू होऊन जलद गतीने काम पूर्ण व्हावे व सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये अशीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.




का म्हणतात शापित रस्ता?: गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्षित केले जाते आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अनेक वेळा नेते मंडळींच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा हा रस्ता जशाच्या तसाच आहे. भारत देश स्वतंत्र झाला पण हा रस्ता मात्र शेवटचा श्वास घेतोय का अशी अवस्था आहे .एका बाजूला तालुक्यात चौफेर रस्त्यांचा विकास होत असताना या रस्त्याकडे मात्र अनेक वेळा नारळ फोडून सुद्धा दुर्लक्षितच राहिला आहे. सर्व काही सकारात्मक असताना सहा महिने झाले वर्क ऑर्डर होऊन तरीही हे काम चालू होत नाही मग याला कोणाचा शाप तर लागला नाही ना?असे ग्रामस्थ उपहासात्मक बोलतात म्हणून या रस्त्याला “शापित रस्ता” असं नाव देऊन पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्याचे काम या पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.




 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here