इंदापूर तालुक्यात काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात, काँग्रेसला इंदापूर तालुक्यातील युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

इंदापूर तालुक्यात काँग्रेसचे सभासद नोंदणी अभियानाला सुरवात
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे सभासद नोंदणी अभियान चालू आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी च्या मार्फत आमदार संजय जगताप अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार इंदापुरात ही काँग्रेसचे सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे .
इंदापुर तालुका कॉग्रेस कमिटी च्या वतीने दिनांक 8 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचे सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ निरा नरसिंहपुर येथील कुलदैवत लक्ष्मी-नृसिंहचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला . हे अभियान पुडील काही दिवस चालणार आहे .
येणाऱ्या काळात चांगल्या होतकरू युवकांना समाजामध्ये चांगले काम करणारे व्यक्तींना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटने मध्ये व येणाऱ्या स्थानिक स्वराज निवडणुकीमध्ये संधी देण्याचा आमचा मानस आहे असे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी सांगितलं.
यावेळी नरसिंहपूर, पिंपरी, टनु, लुमेवाडी येथील नागरिकांशी संवाद साधण्यात आला. पक्षाची व संघटनेची भूमिका अध्यक्ष यांनी स्पष्ट करत येणाऱ्या काळात निवडणुकीच्या संदर्भात ही चर्चा केली.ज्यांना काँग्रेस पक्षाचे सभासद होयचे आहे त्यांनी 9822280075 या नंबर वर संपर्क साधण्याचा आव्हान काँग्रेस पक्षाच्या मार्फत करण्यात आले आहे .यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष स्वप्नील सावंत तसेच कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, जिल्हा सरचिटणीस झाकीर काझी, शहर अध्यक्ष चमनभाई बागवान, अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड, किसन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ संतोष होगले,सरचिटणीस निवास आणा शेळके, सचिव महादेव लोंढे, जिल्हा ओ बी सि सेल चे जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार, अमर भोसले , राजेंद्र नरुटे,नसिर भाई शेख , अदी कार्यकर्ते उपस्तिथ होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here