इंदापूर तालुक्यात आदर्शवत असलेल्या श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ शेटफळ हवेलीची सहल कोकण दर्शनासाठी रवाना.. वाचा सविस्तर.

शेटफळ हवेली येथील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाची आज ४० सदस्यांसह सहल गणपतीपुळे व कोकण दर्शनासाठी रवाना झाली आहे. आज सकाळी ६.३० वा वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथाला श्रीफळ अर्पण करून ही सहल रवाना झाली आहे. शेटफळ हवेली मधील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ हा एक आदर्शवत संघ मानला असून या संघामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवली जातात.
ज्येष्ठ नागरिकांना मानाने-सन्मानाने जगता आले पाहिजे. तो ज्येष्ठांचा मूलभूत अधिकार ठरतो. ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनदरबारी समस्यांच्या निराकरणासाठी व अन्य सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी संघाला मागण्या कराव्या लागतात. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघशक्तीची आवश्यकता असते. त्या दृष्टीने त्याचप्रमाणे आपले बालपणीचे सवंगडी पुन्हा एकदा भेटून गप्पा मारत एकमेकांशी हितगुज करण्याच्या दृष्टीने शेटफळ हवेली सारख्या छोट्याशा गावात एक आदर्शवत ज्येष्ठ नागरिक संघ कार्य करत असून या संघामार्फत आज गणपतीपुळेसह कोकण दर्शनासाठी सहल रवाना झाली आहे.शेटफळ हवेलीचे कलाकार सूर्यकांत चव्हाण सर हे सुद्धा या सहलीत असून आपल्या कलाकारीने ते ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.15 ऑगस्ट 2016 रोजी स्थापन झालेला शेटफळ हवेलीतील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ हा आदर्शवत ज्येष्ठ नागरिक संघ म्हणता येईल याची बरीचशी कारणे आहेत त्यापैकी सांगायचे झाले तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कसलीही महत्त्वाची कामे असली तरी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक गावात स्थापन केलेल्या मध्यवर्ती कार्यालयात एकत्र येतात. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा त्या महिन्यात असलेला वाढदिवस सर्वजण मिळून साजरा करतात, ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी आरोग्य समस्या ह्या जाणून घेतल्या जातात त्यातही काही कौटुंबिक समस्या असेल तरीही या माध्यमातून सोडवल्या जातात हे विशेष..ज्येष्ठ नागरिक संघ क्षेत्र च्या माध्यमातून गावातील वयोवृद्ध शेतकरी, निवृत्त अधिकारी, मजूर, सर्व जाती-धर्माच्या लोक या छत्राखाली एकत्र येतात त्याचप्रमाणे व्यसनमुक्त होण्याची संकल्पना ही करतात. आज पर्यंत भरपूर लोकांनी या संघात आल्यापासून व्यसन सोडून दिले आहे या गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. गावामध्ये ठीक ठिकाणी वृक्षारोपण या माध्यमातून झाले आहे तर नुसते वृक्षारोपण नव्हे तर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून ट्रीगार्ड बसवत त्या झाडाला जपले जाते. येणाऱ्या काळात सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्याचाही मानस आता या संघाने घेतला आहे त्याचप्रमाणे इंदापूर येथील पतंजली योग समितीचे मदन चव्हाण सर व शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचेही नियोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने हनुमंत शिंदे यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here