इंदापूर तालुक्यातील 14 पाझर तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात – माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

सध्या इंदापूर तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे विहिरी आणि कुपनलिकां च्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही तसेच तलाव ही कोरडे आहेत. सध्या ऊस लागवडीचा हंगाम असल्यामुळे उसाच्या लागणीसाठी पाणी भरपूर लागते हे ओळखून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खडकवासला कालव्याद्वारे इंदापुर तालुक्यातील १४  तलावात ताबडतोब पाणी सोडण्या संबंधि अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर श्री भरणे यांचे सूचनेवरून श्री चोपडे यांनी खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना सूचना खडकवासलाद्वारे इंदापुरातील पाझर तलाव भरण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. यानुसार इंदापुर तालुक्यातील तलाव भरण्यासाठी खडकवासलाद्वारे पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी इंदापूर तालुक्यात चार दिवसात पोहचणार आहे. त्यानंतर तालुक्यातील तलावात पाणी सोडले जाणार आहे  सध्या राज्याच्या काही भागात जरी मुसळधार पाऊस सुरु असला तरीही इंदापुर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस नाही . इंदापुर तालुक्याच्या एका बाजुला निरा तर दुसऱ्या बाजुला भिमा नदी आहे . या दोन्ही नदयाच्या मधल्या भागांमधील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यान १४ पाझर तलावांची निर्मिती केली आहे . हे तलावांमध्ये खडकवासला कालव्याच्या माध्यमतुन पाणी सोडण्यात येते .खडकवासला प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी व  तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे.सध्या इंदापूर तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही त्यामुळे विहिरी आणि कुपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही याशिवाय तलावहि कोरडे आहेत तसेच शेतकऱ्यांनी उसाच्या लागणी  सुरू केल्या आहेत. या उसाच्या लागण्यांना सध्या मुबलक पाण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांची शेततळी देखील सध्या कोरडी आहेत. शेतकऱ्यांना  रब्बी व उन्हाळी आवर्तनात शेततळ्यामध्ये पाणी भरता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनाही  चालू आवर्तनाद्वारे शेततळी भरता येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here