इंदापूर : गेले अनेक वर्ष इंदापूर तालुक्यात गोरगरिबांसाठी झटणारे व अन्यायाविरुद्ध वाचा फोडून सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे संदिपान कडवळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली.
अतिशय शांत व संयमी स्वभाव असलेल्या संदिपान कडवळे हे इंदापूर तालुक्यातसह पंचक्रोशी मध्ये वेगवेगळ्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे त्यांनी काम केले आहे. समाजातील गरजू विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांना सहकार्य करण्याची भूमिका हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, रोखठोक भूमिका, व संयमी स्वभाव यामुळेच इंदापूर तालुक्यातील सर्व जाती धर्मातील संदिपान कडवळे यांना मानणारा एक विशेष वर्ग आहे. आजपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा झेंडा प्रामाणिकपणे हाती घेऊन पार्टी वाढवण्याचे काम त्यांनी केले याच कामाची दखल घेत त्यांची पुणे जिल्हा सरचिटणीस पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.यावेळी संदिपान कडवळे म्हणाले की,”आरपीआय पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा मी प्रामाणिकपणे स्वीकार करून पुणे जिल्ह्यात आरपीआय चा विचार घराघरात पोहोचवणार त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांसाठी काम करण्याचा माझा मानस आहे.” असे मत नूतन आरपीआय सरचिटणीस संदिपान कडवळे यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कार्यकारिणी निवड प्रक्रिया करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे होते. सदर बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विकास कदम, पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य संभाजी साळवे, विजय सोनवणे, विक्रम शेलार, शिवाजीराव मखरे, पुणे जिल्हा युवती अध्यक्ष सुप्रिया वाघमारे, पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष जयश्री जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश डाळिंबे, इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.संदिपान कडवळे यांच्या या निवडीमुळे इंदापूर तालुक्यातच नव्हे तर इतरही तालुक्यात संदिपान कडवळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चौकट: आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांचे अत्यंत विश्वासू असलेले संदिपान कडवळे यांनी आत्तापर्यंत तब्बल 15 वर्ष इंदापूर शहर अध्यक्ष व 7 वर्ष इंदापूर तालुकाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. शाहू- फुले- आंबेडकर शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांसाठी दोन अनुदानित ‘मुलांचे वसतिगृह’ चालवत 15 वर्ष एकप्रकारे ते सेवाच करत आहेत.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील संयमी नेतृत्व संदिपान कडवळे यांची आरपीआयच्या (आठवले गट) पुणे जिल्हा...