इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बिंरगुडी येथे संत श्री सद्गुगुरू बाळुमामा यांचा जन्मदिन व कार्तिक महिन्यांतील कार्यक्रम उत्साहात साजरे.

इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बिंरगुडी येथे संत श्री सद्गुरू बाळुमामा यांचा जन्मदिन व कार्तिक महिन्यांतील कार्यक्रम उत्साहात साजरे.

जंक्शन: राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आली व महाराष्ट्र राज्यसह इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत श्री सद्गुरू बाळू मामांचे राज्यातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर इंदापुर तालुक्यातील संत श्री सद्गुरू बाळूमामा अध्यात्मिक तळ श्री क्षेत्र बिंरगुडी येथील मंदिर भाविकांसाठी १७ तारखेला बाळूमामांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दर्शनासाठी कोवीड -१९ च्याअटी व नियम पाळून खुले करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यांचे औचित्य साधुन दिनांक.१२ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर पर्यंत शासकीय नियमांचे पालन करून श्री. सदगुरू संत बाळुमामा आध्यात्मीक तळ बिरंगुडी या ठिकाणी पारायण सोहळा संपन्न करण्यात आला .गेल्या काही दिवसापूर्वी बाळूमामांच्या जन्मदिवशी कोरोना प्रादुर्भाव नियम पाळत मठाधिपती जमीर दाऊद शेख, यशवंत ओगले, शामराव भगत, दाऊद शेख ,पांडुरंग वाघमोडे यांच्या हस्ते बाळूमामांचा अभिषेक संपन्न झाला.भुषण जगताप यांनी रांगोळीतून बाळू मामांची भव्य व सुंदर प्रतिमा साकारून सर्व भक्तांना मोहित केले.त्यानंतर भजन झाले, व दुपारी २ ते ४ या वेळेत विक्रम सुर्यकांत जगताप मेजर यांचे बाळूमामांच्या जन्मदिवसाचे संगीत प्रवचन संपन्न झाले,४ वाजता लालासााे नरोटे, समीर शेख, अशोक गावडे ,तानाजी नरोटे, सतिश धायतोंडे, विक्रम भगत, सचिन देशमुख हस्ते पुजा-अर्चा संपन्न झाली,
या वेळी मठाधिपती व सर्व उपस्थितांनी जगावर आलेल्या कोरोना संकटातून सर्वांना सावरण्याची शक्ती बुध्दी सामर्थ्य बाळूमामा देवो व कोरोना संकट लवकरात लवकर नाहीसे व्हावे अशी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना केली,या दिवशी संग्राम भैय्या प्रतापराव पाटील, दयानंद सांगळे साहेब,पृथ्वीराज जगताप साहेब आवर्जून उपस्थित होते यांच्या हस्ते बाळू मामांची आरती संपन्न होऊन महाप्रसादाने जन्मोत्सवाची सांगता झाली होती.
अशा पद्धतीने इंदापूर तालुक्यातील आध्यत्मिक क्षेत्र बिरंगुडी  ता.इंदापुर येथे विविध उपक्रम साजरा करत कोरोना काळानंतर नव्या जोमाने व नव्या भक्तीने मंदिर चालू झाल्याने श्री सद्गुगुरू बाळुमामा भक्त यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here