रणजीत सुळके या युवकाने भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगण्य रामा आग्रोटेकचे कंपनीचे शिवम इंटरप्राईजेस जैविक सल्ला केंद्र केले सुरू,आज उद्घाटन समारंभ.इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार कमी खर्चात जास्त उत्पन्न

इंदापूर:शेती उत्पन्नामध्ये योग्य मार्गदर्शन व जैविक पद्धतीचा अवलंब न केल्याने उत्पन्नामध्ये घट येत असल्याचे आपण अनेक उदाहरणे पाहिले आहेत आणि याच संदर्भात शेतकऱ्यांना आपल्या शेतातून अगदी कमी खर्चामध्ये भरघोस पिक मिळून त्यांचा आर्थिक लाभ होण्याच्या हेतूने भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगण्य रामा ऍग्रोटेक कंपनीच्या संलग्न शिवम इंटरप्राईजेस या जैविक सल्ला केंद्राचे उद्घाटन समारंभ आयोजन आज मंगळवार (ता.9) रोजी करण्यात येणार आहे.इंदापूर तालुक्यात डाळिंब उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात होते याच डाळिंबाला लागणाऱ्या जैविक तंत्रज्ञानाचा वापर करत आता इंदापूर तालुक्यात डाळिंबाचे उत्पन्न दुप्पट होणार असं म्हणलं तरी काय वावगे होणार नाही.भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगण्य रामा ॲग्रोटेक कंपनीच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टमुळे फक्त डाळिंबच नव्हे तर ऊस,ढोबळी,मिरची केळी,टोमॅटो,द्राक्ष इत्यादी पिकांवर या कंपनीच्या औषधांचा चांगला परिणाम होऊन त्यामध्ये उत्पन्न वाढवण्यास मदत मिळत आहे असे शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर 1 येथील युवक रणजीत विठ्ठल सुळके याच्या संकल्पनेतून इंदापूरमध्ये डॉ कदम गुरुकुल संकुलाच्या समोर रामा ॲग्रोटेक कंपनीचे शिवम इंटरप्राईजेस नावाने फर्म उभा करून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी जैविक तंत्रज्ञान व जैविक खते याद्वारे सर्व पिकांसाठी जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्याच्या हेतूने मार्गदर्शक सेंटर उभारण्यात आले आहे . उद्या या सेंटरचे उद्घाटन समस्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.भारत हा कृषिप्रधान देश असून आपल्या देशातील 70 टक्के लोक हे शेती उत्पन्नावर अवलंबून आहेत व शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.सुरूवातीच्या काळामध्ये शेती विषयी व तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना माहिती नसल्याने खर्च जादा होऊन उत्पन्न कमी व्हायचे तसेच जैविक पद्धतीचा वापर न केल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये घट होत होती.शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा सारासार विचार करून रामा ॲग्रोटेक या कंपनीने जैविक तंत्रज्ञानाचा वापर व त्याचे फायदे याविषयी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आता रणजीत सुळके या युवकाने चालू केलेल्या शिवम इंटरप्राईजेस सेवेमुळे यामुळे इंदापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.यावेळी रामा ऍग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार तसेच प्रश्नांवर चर्चा करणार असून यावेळी सोलापूर,अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित राहणार आहे.आधुनिक जैविक तंत्रज्ञानाची जोड शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल यावरती चर्चा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे असे शिवम इंटरप्राईजेस चे रणजीत सुळके यांनी यावेळी बोलताना दिले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी रणजीत सुुळके -९६९६२३९१९१  ७७२०८३९१९१

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here