इंदापूर: इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोट्यावधी रुपये निधी आणून तालुकाभर उद्घाटनाचा सपाटा लावणारे धडाकेबाज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा आजही शहा गाव व पंचक्रोशीतील गावांमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटने व शहा गावात सभेचे संध्याकाळी 6 वाजता आयोजन केलेले असून या कार्यक्रमांमध्ये राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे खंडित केलेल्या विजेबाबत बोलतील का? याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून पिके जळून चाललेल्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे याचे कारण म्हणजे वीज वितरण कंपनीने वीज वसुली पोटी शेतीसाठी लागणारी वीज ही तोडण्याची एकहाती मोहीम सुरू केली आहे, आणि याचा फटका सर्व शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती की उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांबाबत सहानुभूती नक्कीच दाखवतील कारण निवडणुकी पूर्वी चा वीज बिलाबाबत चा व्हिडीओ अजित दादांचा चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण सद्यस्थितीत सर्वकाही उलटे घडत असल्याने शेतकऱ्यांचा महाविकास आघाडीवरचा विश्वास कमी होताना दिसत आहे.त्यातच आजच सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर आंदोलन करीत एक प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला होता, व त्याच प्रमाणे तालुक्यातील जगदाळे,घोलप व जाचक हे हर्षवर्धन पाटलांच्या सोबत एकत्र येऊन वीज वितरणाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याने आजच्या राज्यमंत्र्यांच्या सभेकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे.
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आज होणाऱ्या सभेमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वीज कपातीबाबत घेतले मौन आज ते सोडतील का? व शेतकऱ्यांना काही दिलासा देतील का? याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.