इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

इंदापूर तालुक्यातील व्यायामशाळा व विद्यालयांना क्रीडा साहित्यासाठी 1.53 कोटींचा निधी – हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.16/5/23
इंदापूर तालुक्यातील व्यायामशाळाना साहित्य खरेदीसाठी व विद्यालयांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी एकूण 1.53 कोटींचा निधी पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन 2022- 23 मधून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.16)दिली.सदर निधी मंजूर केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले पासून निधीचा ओघ वाढला असून, इंदापूर तालुक्यातील विकास कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022 23 व्यायाम शाळांना मंजूर निधी: –१) ग्रामपंचायत भिगवण – व्यायाम शाळा साहित्य – 7 लाख, २) ग्रामपंचायत अकोले धायगुडेवाडी – ओपन जिम साहित्य – 7 लाख, ३) पळसनाथ विद्यालय पळसदेव व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ४) ग्रामपंचायत गोंदी- ओपन जिम साहित्य 7 लाख, ५) ग्रामपंचायत म्हसोबावाडी व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ६) ग्रामपंचायत भोंडणी- ओपन जिम साहित्य 7 लाख, ७) लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ८) प्रगती विद्यालय लोणी देवकर व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, 9) ग्रामपंचायत निमसाखर रूणमोडे वस्ती व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, १०) ग्रामपंचायत अकोले व्यायाम शाळा साहित्य 7 लाख.
जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपाय योजना सन 2022 23 व्यायाम शाळांना मंजूर निधी: –१) महात्मा फुले विद्यालय बिजवडी व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, २) ग्रामपंचायत भिगवण संत रोहिदास चर्मकार वस्ती व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ३) ग्रामपंचायत रेडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा भवन व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ४) ग्रामपंचायत रुई कांबळे वस्ती व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ५) ग्रामपंचायत वालचंदनगर मेन कॉलनी दलित वस्ती व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ६) कस्तुरबा बी.सी. बिल्डिंग इंदापूर व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ७) श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बावडा व्यायाम शाळा साहित्य 7 लाख,
क्रीडांगण विकासा अनुदान योजना सन 2022-23 सर्वसाधारण मंजुर निधी :-१) हनुमान विद्यालय सुरवड क्रीडा साहित्य 3 लाख, २) कर्मवीर शंकररावजी पाटील माध्यमिक विद्यालय कुरवली क्रीडा साहित्य 3 लाख, ३)श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा साहित्य 3 लाख, ४) प्रगती विद्यालय लोणी देवकर क्रीडा साहित्य 3 लाख, ५)नंदिकेश्वर प्रगती विद्यालय सराफवाडी क्रीडा साहित्य 3 लाख, ६)पळसनाथ विद्यालय पळसदेव क्रीडा साहित्य 3 लाख, ७)कला वाणिज्य महाविद्यालय भिगवण क्रीडा साहित्य 3 लाख,८) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावडा क्रीडा साहित्य 3 लाख, ९)उत्कर्ष विद्यालय कालठण क्रीडा साहित्य 3 लाख, १०)लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी प्रसाधनगृह बांधणे 7 लाख.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here