इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख प्रदीप दादा गारटकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये 12 सरपंच राष्ट्रवादीचे व 03 ठिकाणी संमिश्र जागा अशा एकूण 15 जागांवर आपला दावा केला आहे.
त्याचबरोबर विरोधकांनी कितीही जागेचा दावा केला असला तरी त्यांना अकरा जागा मिळाल्या आहेत असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की बेलवाडी तसेच डाळज नंबर- १,२,३ ह्या जागी पराभव होईल असे वाटत नव्हते कारण त्या ठिकाणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून प्रचंड विकास कामे झालेले असताना तेथे पराभव होणे हे अपेक्षित नव्हते असे प्रदीप गारटकर यांनी सांगितले .राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही तालुक्यातील पहिलीच निवडणूक आहे आणि असे असतानाही आम्हाला ज्यादा जागा मिळाले यात समाधान वाटते. इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे कामच नाही. भाजपा शहरी भागात ED चा वापर करून दबाव तंत्र वापरत असल्याने शहरी भागात याचा काही प्रमाणात फरक पडतो. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर असे आरोप करता येत नाही म्हणून ग्रामीण भागात राष्ट्रवादीच सरस ठरत आहे असे जिल्हाध्यक्ष म्हणाले. ज्यावेळी आम्ही ओळख परेड घेऊ त्यावेळी आम्ही दावा करत असलेल्या 15 जागांपेक्षा ज्यादा जागा पाहायला मिळतील पण यापेक्षा कमी जागा पाहायला मिळणार नाहीत अशी खात्रीही गारटकर यांनी यावेळी दिली. यावेळी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 219 ग्रामपंचायत पैकी 131 ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जनतेने याद्वारे विश्वासच टाकला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच सरस ठरत आहे असेही जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा 15 जागांवर दावा. पुन्हा एकदा ग्रामीण भागात राष्ट्रवादीच...