इंदापूर : इंदापूर तालुक्यातील 6 रस्त्यांच्या कामासाठी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 च्या पावसाळी पुरवणीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण रु. 29 कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.17) दिली.
शिवसेना-भाजप युती सरकार राज्यात सत्तेवर आले नंतर हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 मध्ये निधी मंजूर झालेले 6 रस्ते पुढीलप्रमाणे
1) बावडा (रा.मा.120) ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत इ.जि.मा. 213 ची सुधारणा करणे (रु.9 कोटी),
2) बावडा (प्र.जि.मा. 86) काकडे वस्ती-शेटे वस्ती ते सावंत वस्ती बावडा ग्रा.मा.200 रस्ता करणे-(रु.4 कोटी),
3) टणु रा.मा.120 ते टणू (चव्हाण वस्ती) बंधारा ते गावठाण ग्रा.मा. 202 रस्ता सुधारणा करणे – (रु.4 कोटी),
4) वालचंनगर- सराफवाडी- रेडा- शहाजीनगर -भोडणी ते राज्यमार्ग 125 रस्ता रुंदीकरण करणे प्र.जि. मार्ग 126 कि.मी.18/00 ते 23/00 सुधारणा करणे- (रु.4 कोटी),
5) सणसर राज्य मार्ग 121 ते रायते मळा, खटके वस्ती ते सणसर रा.मा. 120 सुधारणा करणे ग्रा. मा. 266 – (रु.4 कोटी),
6) वकीलवस्ती रा.मा.125 ते भांडगाव (प्र.जि. मार्ग 86 पर्यंत) रस्ता करणे ग्रा.मा.77 – (रु.4 कोटी).
शिवसेना-भाजप महा युती सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी रस्ते व इतर विकास कामासाठी भरघोस निधी आणणेसाठी आंम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सदर निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.