इंदापूर:संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पुणे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केली असून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा नियोजनबद्ध होण्यासाठी आज इंदापूर तालुक्यामध्ये पालखी स्थळे व तेथील पाहणी प्रशासन अधिकारी यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. तसेच सध्या सुरू असलेल्या पालखी महामार्गाचे काम यामुळे वारकरी संप्रदायाला अडथळा निर्माण होवू नये म्हणून तिथे गरज असेल अशा ठिकाणी योग्य ति काळजी घेतली जावी त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याची सोय पिण्यासाठी शुद्ध पाणी व वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पालखी मुक्कामी ठिकाणाची वाहने पुढे पाठवणे अशा सर्व प्रकारची प्रशासन अधिकारी यांनी योग्य ति काळजी घेण्यात यावी असे अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी प्रशासनाला सुचेना केल्या.
या वेळी कलेक्टर साहेबांनी सुरवड ग्रामपंचायत ला भेट देत तेथील पालखी मुक्कामाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या बाबत सुरवड ग्रामपंचायत चे सरपंच सौ. योगिता तुकाराम शिंदे यांच्याशी साहेबानी सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर ग्रामपंचायतीची माहिती घेऊन ग्रामपंचायत करत असलेल्या कामाचे कौतुकही केले.या वेळी कलेक्टर साहेबांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व इंदापूर चे तहसिलदार श्रीकांत पाटील, पंचायत समिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, यांचा देखिल सुरवड ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच दिपक कांबळे , तात्यासाहेब कोरटकर, श्री मेहर साहेब श्री चांगदेव घोगरे, शेरकर महाराज, साहेबराव घोगरे, श्री शिवाजीराव कोरडकर, श्री गणपत सुतार, रमेश महाराज कोरटकर, व ग्रामसेवक श्री प्रल्हाद आबनावे,व पोलिस पाटील उपस्थित होते.