इंदापूर तालुक्यातील बिजवडी शाळेला उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी सदिच्छ भेट देत उपक्रमांचे केले कौतुक.

अवधूत पाटील: उपसंपादक
इंदापूर: बुधवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिजवडी तालुका इंदापूर शाळेला पंचायत समिती भोर उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे मॅडम व पंचायत समिती इंदापूर उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे साहेब यांची सदिच्छा भेट झाली.
शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सखोल माहिती सोनवणे मॅडम यांनी घेतली. साप्ताहिक ऑनलाईन कृतीपत्रिका,साप्ताहिक ऑफलाईन कृतीपत्रिका,ऑनलाईन चाचण्या, ऑनलाइन झूम क्लासेस,स्टार ऑफ द वीक उपक्रम, गणित अध्ययन समृद्धी उपक्रम,स्माईली उपक्रम , इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम, कला कार्यानुभव उपक्रम,संगणक कक्ष, स्वच्छता विषयक उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता,ओसरीवरील शाळा उपक्रम, फिरते वाचनालय उपक्रम इत्यादी उपक्रमांची माहिती शाळेतील शिक्षिका श्रीमती रुकसाना युसुफ शेख व श्रीमती इशरत हमीद मोमीन यांनी सांगितली.

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवाहात टिकण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी केलेली व्हिडिओ निर्मिती,ऑनलाईन चाचण्या व ऑनलाईन खेळ निर्मिती,कृतीपत्रिका निर्मिती,लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य निर्मिती या सर्व बाबींचा आढावा घेत शाळेतील शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शाळेतील शिक्षकांचे तालुकास्तरीय ऑनलाईन शिक्षणातील योगदानाबद्दल अभिनंदन केले.
गटशिक्षणाधिकारी बामणे साहेब यांनी तालुक्यातील ऑनलाईन शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या महिलांच्या विशेष योगदानाबद्दल माहिती दिली असता सोनवणे मॅडम यांनी तंत्रस्नेही महिलांबाबत गौरवोद्गार काढले. तालुक्यातील महिला शिक्षकांनी विद्यार्थी प्रति असणाऱ्या स्वतःच्या तळमळीतून डिजिटल शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे .तालुक्यामध्ये महिला तंत्रस्नेही शिक्षिकांचे लक्षणीय प्रमाण ही कौतुकास्पद बाब आहे याचा विशेष उल्लेख करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी बामणे साहेब यांनी शिक्षण विभागाच्या सावित्रीच्या लेकी या पुस्तकाविषयी माहिती सांगत तालुक्यातील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण विषयक विविध उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हा परिषद शाळा बिजवडी शाळेतील सौ वैशाली महादेव चव्हाण श्रीमती रुकसाना युसुफ शेख व श्रीमती इशरत हमीद मोमीन यांच्या कार्यासाठी गटविकास अधिकारी परीट साहेब , गटशिक्षणाधिकारी बामणे साहेब व तालुक्यातील समस्त शिक्षक बंधू भगिनींनी शुभेच्छा दिल्या.



हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार वाचा खालील लिंक ओपन करून। 👇👇

https://janataexpressmarathinews.com/माजी-सहकारमंत्री-हर्षवर्/



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here