आम्ही गलांडवाडीकर नं. १ या नावाने गावातील सामाजिक बांधिलकी जपत गावातील विधायक सामाजिक कामासाठी अस्तिवात आलेल्या सोशल मीडिया ग्रुपच्या वतीने १० वी व १२वी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी यांचा सत्कार व गुणगौरव समारंभ संपन्न झाला आम्ही गलांडवाडीकर नं.१ या ग्रुपमध्ये गावातील सर्व शासकीय सेवेत असणारे अधिकारी ,सेवनिरुत्त मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विविध शासकीय सेवेत असणारे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस दलातील अधिकारी, कृषी अधिकारी,परदेशात नोकरी करणारे गावातील सुपुत्र यांनी हा ग्रुप स्थापन करून गावामध्ये सामाजिक उपक्रम राबविले जातात.यामध्ये विठ्ठल रुख्मिणी मंदिर जीर्णोध्दार असेल किंवा गावातील सामाजिक उपक्रम या ग्रुपमधील सर्व सभासद कोणतेही उपक्रमास आर्थिक मदत करतात. गावातील भूमिपुत्र आदेश संजय फलफले या विद्यार्थ्याने चांद्रयान मोहीम 3 मध्ये तांत्रिक विभागात सहभाग घेतला होता,याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.तसेच विविध शासकीय सेवेत निवड झालेले पोलिस अधिकारी,पोलिस दलातील निवड करण्यात आलेले पोलिस यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच सेवानिवृत्त मुखयाध्यापक श्री .अशोक भोईटे सर , महात्मा फुले विद्यालय ,बिजवडी यांचाही सत्कार उत्कृषटरित्या सेवा प्रस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.पोलिस अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आलेले श्री अनिकेत वाघ, विजय ढवळे तसेच पोलिस दलातील निवड करण्यात आलेले श्री.प्रवीण कचरे, कोमल भोसले, रवींद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला.विविध आय . टी क्षेत्रात निवड झालेले तरुण ,परदेशात उच्चपदावर निवड झालेले तरुण यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय हेगडे संचालक शिक्षण व कॅरियर आकडमी यानी १० वी व १२वी नंतर शिक्षण व करिअर या विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री . मनोहर चौधरी सचिव इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्री . पन्हाळकर सर व मनीषा सूर्यवंशी मॅडम यानी केले.याप्रसंगी दीपक जाधव,उत्तमराव जाधव चेअरमन दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ इंदापूर,श्री .विकास फल फले मुख्याध्यापक,श्री.भगवान मोरे,सेवानिवृत्त इंजिनियर ,हरी जाधव संचालक खरेदी विक्री संघ इंदापूर ,श्री ज्ञानेश्वर वाघमारे,बांधकाम व्यवसायिक,चेअरमन सिद्धिविनायक पथसंस्था ,पुणे ,श्री अशोक फळफले प्रशासन अधिकारी, पंचायत समिती इंदापूर,श्री सुयाकांत कचरे , व कृषी विभागात कार्यरत असलेल्या गावातील भूमिपुत्रांचाही सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक गलांडे सर यानी केले.आभार प्रदर्शन श्री गणेश सूर्यवंशी कृषी अधिकारी यांनी केले.मोठ्या संख्येने विद्यार्थी,ग्रामस्थ व पालक या गौरवासाठी उपस्थित होते.