आज पुणे येथे खडकवासला कालवा व निरा डावा कालवा प्रकल्प सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीस राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या सह इंदापूर तालुक्याचे आमदार मा. दत्तात्रय मामा भरणे, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, मा. आ. दिपक साळूखे, आ.दिलीप मोहिते ,आ. अशोक पवार, आ. सुनील शेळके,आ. राहुल कुल, आ. चेतन तुपे पाटील यांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी इंदापूर तालुक्यातील खडकवासला व नीरा कालव्याच्या लगतच्या विहिरींना नव्याने पाणी पट्टी कर आकारणी जलसंपदा विभागामार्फत आकारली जात आहे.विहिरींची पाणी पट्टी आकारणी तात्काळ माफ करावी.अशी मागणी मा. दत्तात्रय मामा भरणे यांनी केली. यावर पालकमंत्री ना. पाटील यांनी जलसंपदा विभाग विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने विहिरीची आकारणी माफ करण्याबाबत सूचना केल्या तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास सांगितले याबाबत शासन स्तरावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वस्त केले.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील खडकवासला व नीरा कालव्याच्या लगतच्या विहिरींना नव्याने आकारण्यात आलेली पाणीपट्टी...