इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी क्षेत्रामध्ये बारामतीहून सकाळी उड्डाण केलेले कार्व्हर इव्हेशन चे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की,बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेले विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीनजीक आज कोसळले. विमान कशामुळे पडले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र या ठिकाणी कार्व्हर एव्हिएशनचे अधिकारी पोचलेले आहेत.
बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उठ्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात कोसळले.ही घटना समजताच शेजारील पोंकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढले. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, बाकी विमानाची मात्र दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी बारामतीतून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक तिथे पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या महिला पायलट यास कडबनवाडी नजीक शेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे समजते.यापूर्वी 2019 ला अशीच एक दुर्घटना बारामतीतील प्रशिक्षण देणाऱ्या विमानाची इंदापूर तालुक्यातील रुई या ठिकाणी झालेली होती.