अखेर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, विहिरीवरील मोटर व केबल चोरी करणारी टीम जेरबंद. शेतकरी संघर्ष समितीने दिले होते निवेदन.

गेल्या काही महिन्यापासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी विहिरीवरील मोटर व केबल चोरीच्या प्रकारामुळे हैरान होऊन गेलेला दिसून आला होता शेटफळ हवेली काटी, भोडणी,सुरवड, बावडा व पंचक्रोशीतील गावांमध्ये मोटरी चोरीचे प्रमाण खूप वाढलेले होते. हे प्रमाण इतके वाढले गेले की शेतकरी संघर्ष समितीला पोलीस निरीक्षक मुजावर यांना निवेदन द्यावे लागले होते व यात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या त्याचप्रमाणे संबंधित चोरांचा बंदोबस्त करावा या कारणासाठी बावडा पोलिस स्टेशन व शेतकरी संघर्ष समिती सदस्य यांची बैठकही संपन्न झाली होती. परवा झालेल्या बैठकीनंतर इंदापूर पोलिस स्टेशनने ठोस पावले उचलत, व आपली गुप्तचर यंत्रणा कामाला लावत संबंधित आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.
इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विहिरी वरील व इतर ठिकाणच्या पाण्याच्या मोटार चोरी करणारी टोळीला जेरबंद करण्यात इंदापूर पोलीसांना करण्यात यश आले आहे.सदर टोळी कडून ५ इलेक्ट्रीक मोटारी, केबल, कटर व रोख असा १०४,००० /- (एक लाख चार हजार ) रुपये किंमतीचा मुद्देमाल  जप्त केला आहे.
इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार शेतकऱ्यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरी जाण्याचे गुन्हे घडत होते. त्यामुळे इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे गुन्हे दाखल होत होते.सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक श्री. डॉ. अभिनव देशमुख यांनी वेळोवेळी गुन्हे उघडकीस आणण्याचा आढावा घेऊन त्यासाठी एक खास पथकाची केली होती.सदर नेमुण केलेल्या पथकाने गुन्ह्यातील आरोपींना अटक करुन गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदर पथकात  नेमणूक केलेल्या पथकाने मोटार चोरी करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांवर नजर ठेऊन गोपनीय माहीती काढुन प्रथम एक अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार १) राहुल सावताराम भोंग, रा. काटी ता. इंदापुर जि. पुणे याच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.सदर आरोपी राहुल भोंग यास अटक करुन त्याच्याकडे तपास करुन त्याचे इतर दोन साथीदार १) कमलेश उदयराज यादव, २) प्रविणकुमार दुर्गाप्रसाद यादव दोन्ही रा. उत्तर प्रदेश हे असल्याचे निष्पन्न झालेने त्यांना अटक करुन सदर आरोपीतांकडे अद्यापपर्यंत झालेल्या तपासात इंदापुर पो.स्टे. व इतर ठिकाणचे असे एकूण अकरा गुन्हे उघड करण्यात आले आहेत.सदरील चोरीतील आरोपी १) राहुल सावताराम भोंग,रा. काटी ता. इंदापुर जि. पुणे, २) कमलेश उदयराज यादव, ३) प्रविणकुमार दुर्गाप्रसाद यादव दोन्ही रा. उत्तर प्रदेश व एक अल्पवयीन बालक या आरोपीतांकडुन मौजे काटी,वडापुरी, बावडा, गिरवी, गोखळी, रेडा व रेडणी, निमगाव केतकी, या ठिकाणांवरुन चोरी केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या ५ पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी, केबल्स,कटर व चोरलेल्या ७ मोटारी विकुन आलेले १६,००० /- रुपये रोख असा एकुण १०४,०००/-(एक लाख चार हजार ) रुपये कींमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही डॉ अभिनव देशमुख( पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण),मिलींद मोहिते ( अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग), गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी)  यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, सपोनि नागनाथ पाटील, सपोनि ज्ञानेश्वर धनवे, सपोनि महेश माने, सपोनि प्रकाश पवार, पोसई दाजी देठे,पोसई अपर्णा जाधव, पोसई संजय धोत्रे, सहा. फौजदार कचरु शिंदे, सहा.फौजदार सतीश ढवळे,पो.हवा.पवन भोईटे,पो.हवा मनोज गायकवाड, पो. हवा. अमोल खैरे, पोना बापू मोहिते, पोना सलमान खान,पोना अमोल गायकवाड, पोना. कळसाईत पोकों विशाल चौधर, पोकॉ नरळे व पोकों विकास राखुंडे, यांनी केली आहे. एकंदरीतच संबंधित आरोपी पकडल्यामुळेे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने इंदापूर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here