इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी श्री मुलानी एस टी तर उपाध्यक्षपदी संजीव कुमार पांढरे सर यांची एकमताने निवड

बावडा :इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघाच्या कार्यकारिणीची बैठक श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी या ठिकाणी 1 जानेवारी 2022 रोजी संपन्न झाली यावेळी इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघ कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर जिल्हा समन्वयक श्री उस्मान मुलानी सर व श्री छत्रपती विद्यालय भवानीनगर चे प्राचार्य श्री रमेश मचाले सर केजी उपस्थित होते, नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली, नवीन कार्यकारिणीची सभा खेळीमेळीत पार पडली,
या निवडीनंतर 5 जानेवारी 2022 रोजी श्री शिवाजी विद्यालय बावडा येथे हिंदी अध्यापक संघ इंदापूरच्या नवीन कार्यकारिणीचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य श्री दशरथ घोगरे सर यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री शिवाजी विद्यालय बावडा या शाळेला हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष पद श्री मुलानी एस टी यांच्या रूपाने मिळाल्याबद्दल प्राचार्य श्री घोगरे सर यांनी जिल्हा समन्वयक बाबीर विद्यालयाचे श्री उस्मान मुलानी सल्लागार व छत्रपती विद्यालय भवानीनगर चे प्राचार्य श्री रमेश मचाले सर तसेच हिंदी अध्यापक संघाचे सचिव व केतकेश्वर विद्यालयाचे श्री किसन भंग सर व तज्ञ मार्गदर्शक नंदकिशोर नंदकिश्वर विद्यालयाचे श्री सुधाकर भोंग सर व लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयाचे श्री राजेंद्र रणमोडे सर यांचा सत्कार करण्यात आला.
प्राचार्य श्री घोगरे सर यांनी हिंदी अध्यापक संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन कार्यकारिणीला आश्वस्त केले व फेट्याच्या तिढ्याचे रहस्य ही सांगितले
यावेळी हनुमान विद्यालयाचे प्राचार्य श्री चंद्रकांत कोकाटे सर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री हासे सर श्री यादव सर , कोळी सर हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री मुलाणी सर तसेच सय्यद मॅडम ,घोगरे मॅडम, कवडे मॅडम ,यादव मॅडम ,खतीब मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रेय सातपुते सर यांनी केले व आभार श्री दिनेश पाटील सर यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here