इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडले – अँड.शरद जामदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल जो हल्ला झाला या पार्श्वभूमीवर इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपचा कार्यकर्ता बद्दल जे वक्तव्य केले याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी म्हटले.
शरद जामदार म्हणाले की,’ भाजपा बद्दल जी बदनामी केली जात आहे ती कदापि सहन केली जाणार नाही. भारतात लोकशाही असून मोगलाई नाही त्यामुळे रस्त्यावर फिरु देणार नाही अशी भाषा कोणी वापरू नये. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवस आंदोलन चालू होते त्याच्या उद्रेकातून काल ही घटना घडली. सदरची घटना निंदनीय व महाराष्ट्रच्या संस्कृतीला अशोभनीय आहे सदर घटनेचा आम्ही निषेध करतो.
भाजप पक्षाचे कार्यकर्ते संस्कारक्षम, सक्षम, आणि प्रामाणिक असून जर चुकीच्या पद्धतीने कोणी अंगावर आले तर शिंगावर सुद्धा आम्ही घेऊ हेही लक्षात घ्यावे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात याचंही भान ठेवावे, ज्यांचे स्वतःचे घर काचेचे आहे त्यांनी दुसऱ्याचा घरावर दगड मारण्याचे स्वप्नातही पाहू नये.
राज्यात गृहखाते त्यांचा पक्षाचे आहे हल्ला घडेपर्यंत पोलिस यंत्रणा व गुप्तचर यंत्रणा काय करत होती. अशा घटना का घडतात का उद्रेक होत आहे. शेतकरी का रस्तावर उतरत आहे यास महाविकास आघाडीचे अपयशी सरकार जबाबदार आहे.
सत्यता पडताळून न पाहता बेछूट आरोप करणे थांबवावे. महाविकास आघाडीवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here