इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांचा कारभार इतर पतसंस्थांसाठी आदर्शवत – आमदार दत्तात्रय भरणे.

👉 इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे नूतन सभापती व उपसभापतींचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार.
इंदापूर: इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांचा कारभार हा आदर्शवत असून संचालक मंडळ काटकसरीने व पारदर्शकपणे कार्य करत असल्याचा अभिमान आहे असे मत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिक्षक पतसंस्थेच्या नूतन सभापती व उपसभापतींच्या सत्कार कार्यक्रमात भरणेवाडी येथे व्यक्त केले.पुढे ते म्हणाले की,इंदापूर शिक्षक पतसंस्थेचे संचालक मिटींगचा भत्ता घेत नाहीत,सभासदांच्या चहापानाचा खर्च, पतसंस्थेतील सत्काराचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात. हे धोरण काटकसरीचे असून इतर पतसंस्थांनी सुद्धा याचा आदर्श घेतला पाहिजे. काल इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापती व उपसभापतीच्या बिनविरोध झालेल्या निवडीमध्ये सभापतीपदी दत्तात्रय ठोंबरेउपसभापती पदी सतीश गावडे यांची निवड झाली होती याच कारणास्तव आज माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मावळते सभापती व उपसभापती अनुुुक्रमे  अदिनाथ धायगुडे व रामचंद्र शिंदे यांच्याही कार्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी कौतुक केले.या सत्कार सोहळ्या वेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे ,कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे ,मा.चेअरमन दत्तात्रय तोरसकर , सचिव प्रशांत भिसे,मा.चेअरमन अदिनाथ धायगुडे, मा.व्हाइस चेअरमन रामचंद्र शिंदे,संघाचे सरचिटणीस शेखर मिसाळ,संचालक भारत बांडे, बालाजी कलवले,शशिकांत शेंडे, संतोष तरंगे आणि सयाजीराव येवले, संजय दगडे ,उत्तम खारतोडे,रामदास पांडूळे, अंबादास नरूटे हे स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here