महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24 मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ यांना सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे बंधनकारक असल्याने रविवार दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर जिल्हा पुणे च्या सर्व संचालकांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.सहकार प्रशिक्षण केंद्र पुणे येथील प्रा.गंगाधर जाधवआणि महेंद्र खरात व्याख्याते पुणे यांनी सर्व संचालकांना अतिशय अभ्यासपूर्ण प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणामध्ये सहकार कायदा 1960 नियम 1961 त्याचे पोटनियम यासंबंधी माहिती देण्यात आली. त्यामध्ये एन टू फॉर्म , शेअर्स गोळा करण्याचे उद्दिष्ट, सभासद वर्गणी आकारणीचे नियम, कर्जफेडीचे एकूण हफ्ते , नियामक मंडळाची कार्यप्रणाली, नफ्यातून विविध निधींचे टक्केवारी नुसार नियोजन करणे , कलम 73 ठेवीचा व्याजदर ठरवणे, कर्जाचा व्याजदर ठरवणे, वार्षिक सभा नियमावली , कॅशलेस व्यवहार करणे आदी विविध मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संचालकांनी विचारलेल्या शंकांचे निरसर करण्यात आले. प्रशिक्षणास मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थेचे विद्यमान चेअरमन आदिनाथ धायगुडे म्हणाले की सदर प्रशिक्षणामुळे आम्हा सर्व संचालक मंडळास नवीन दिशा मिळाली आहे. भविष्यात संचालक मंडळ संस्थेच्या आणि सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय घेईल. संस्था निश्चितपणे नावारूपाला आणण्यास मदत होईल. यावेळी प्रशिक्षणास संगीता पांढरे, संजीवनी गरगडे, बालाजी कलवले, सतीश दराडे, भारतबांडे सतीश गावडे, भाऊसाहेब वणवे,अनिल शिंदे, संजय मस्के, संतोष तरंगे, सचिन देवडे, शशिकांत शेंडे ,प्रशांत घुले, सुहास मोरे ,सदाशिव रणदिवे ,संतोष गदादे, सुप्रिया आगवणे आदि संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक उपसभापती रामचंद्र शिंदे तर आभार संस्थेचे सचिव *प्रशांत भिसे यांनी मानले.
Home Uncategorized इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेच्या संचालकांसाठीची ‘प्रशिक्षण कार्यशाळा’ संपन्न !!!