इंदापूर: इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने सात वर्षामध्ये मनमानी कारभार केला आहे. सभासदांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यात सर्वात निचांकी लाभांश देण्यात आला आहे. व्यापारी गाळे आणि कार्यालयासंदर्भात प्रचंड आर्थिक अनियमितता दिसून येत आहे. उत्पन्नात वाढ होईल असे सांगण्यात आले परंतू आर्थिक अपहाराची गंभीर प्रकरणे सोसायटीमध्ये घडून आलेली आहेत.सर्व पदाधिकाऱ्यांनी संयमाने प्रचार करत सत्ताधारी संचालक मंडळाचा चुकीचा कारभार सभासदांसमोर मांडायचा आहे. आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. यावेळी इंदापूर तालुका सह.पतसंस्थेवर स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलचीच सत्ता येणार आहे. असे मत शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे यांनी मांडले.
यावेळी स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलच्या वतीने खालील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
अनु.जाती /जमाती राखीव मतदार संघ
१) सुहास मोरे
२) नितीन मिसाळ
इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघ
१) संतोष गदादे
भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव मतदार संघ
१)बाळासाहेब महानवर
२)सचिन देवडे
३) घोळवे सर्जेराव
महिला राखीव मतदार संघ
सौ.संगीता सुरेश पांढरे
इंदापूर सर्वसाधारण मतदार संघ
१) देवडे सचिन
२) महानवर बाळासाहेब
३) घुले प्रशांत
४) ठोंबरे दत्तात्रय
भिगवण-लोणी देवकर सर्वसाधारण
१)खारतोडे उत्तम
२) शिंदे अनिल
३) कलवले बालाजी
४) बांडे भारत
५)भोई विठ्ठल
६)दराडे सतीश
७) दगडे संजय
सणसर-निमसाखर सर्वसाधारण मतदार संघ
१)धायगुडे अदिनाथ
२) संतोष गदादे
३) रणदिवे सदाशिव
४) घोळवे अनिल
५) दराडे हरिश्चंद्र
बावडा-रेडणी सर्वसाधारण मतदारसंघ
१)शिंदे रामचंद्र
२)तरंगे संतोष कुमार
३) गरगडे उध्दव
४) चव्हाण दत्तात्रय
लासुर्णे निमगाव सर्वसाधारण मतदार संघ
१) वणवे भाऊसो
२) गावडे सतीश