इंदापूर तालुका खरेदी-विक्री संचालक पदी प्रतीक बिभीषण घोगरे यांची निवड.

इंदापूर: अप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडीमध्ये इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी प्रतीक बिभीषण घोगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रतीक घोगरे हे मूळचे गणेशवाडी गावचे असून अप्पासाहेब जगदाळे यांनी युवा चेहऱ्याला संधी देत एक आदर्श निर्माण करून दिला आहे.
आगामी काळात आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगले व पारदर्शक काम करू अशा भावना यावेळी प्रतीक घोगरे यांनी व्यक्त केल्या.यावेळी आमदार यशवंत तात्या माने,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मधुकर मामा भरणे,विलासराव माने, संदीप पाटील ,सुभाष दिवसे, दत्तात्रेय फडतरे, कुमार गायकवाड ,अमोल भोईटे, सभापती तुषार जाधव ,उपसभापती मनोहर ढुके, कर्मयोगी कारखान्याचे संचालक रवींद्र सरडे, शांतीलाल शिंदे, संतोष चव्हाण ,शिवराज जगदाळे ,अक्षय जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here