इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीस अभिवादन.

इंदापूर: आज इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदापूर शहरातील न्याय मंदिरासमोर असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर,युवक अध्यक्ष मिलिंद साबळे,शहर अध्यक्ष चमन भाई बागवान,महेंद्र दादा रेडके, सरचिटणीस जकिर भाई काझी,तालुका निरीक्षक बिभीषण लोखंडे,सचिव आयु.एम बी लोंढे,काँग्रेस चे कार्यकर्ते आणि आपली नाती,आपली माणसं,आपला परिवार ग्रुप चे अध्यक्ष शिवाजीराव आहेर,प्रेरणादायी विचारांचा साठा असलेले संपतजी पुणेकर,श्री पारेकर,आदी मान्यवर आणि कार्यकर्तेच्या यांच्या उपस्थित अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here