इंदापूर एक ऐतिहासिक शहर असून छत्रपती मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी… याच ऐतिहासिक इंदापुर नगरीचे माजी राज्यमंत्री आमदार दत्तामामा भरणे यांनी सुशोभीकरण करून इंदापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसून आला होता. अनेक अंतर्गत रस्ते चांगलेही झाले मग ते शहरापुरतेच नव्हे तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात व खेडोपाड्यात रस्तेच रस्ते कधी नव्हे तेवढे झाले.(काही रस्त्यांच्या दर्जाबाबत अजूनही लोकांमध्ये चर्चा आहे).त्यातच काही वर्षांपूर्वी इंदापूरची प्रशासकीय इमारत भव्य-दिव्य झाली आणि त्याच्या समोरील रस्ता सुद्धा १०० फुटी झाला. परंतु आजपासून बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या हेतूने देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या येणार असून इंदापूर प्रशासकीय कार्यालयासमोरील रस्त्याची मात्र चाळण झालेली आहे. अनेक मोठ्या प्रमाणात खड्डे पडून वाहनांना येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. बारामती इंदापूर या रोडवरील गावांना इंदापुरात येण्याचा हा मार्ग आहे असून दररोज हजारो नागरिक कामानिमित्त प्रशासकीय भवनात येत जात असतात.अनेक शाळकरी मुले या मार्गावरूनच शाळेत जात आहेत. परंतु हा रस्ता गेल्या चार ते पाच महिन्यापासून खिळखिळ झालेला असून या रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रास होत आहे.अनेक प्रशासकीय अधिकारी नेतेमंडळी आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा ताफा याच रोड वरून जातो. परंतु या बाबतीत अद्याप पर्यंत कोणीही वाच्यता केली नाही. त्यामुळे देशाच्या अर्थमंत्री येण्याच्या निमित्ताने का होईना पण हा रस्ता नीट झाला पाहिजे अशीच स्थानिकांची इच्छा आहे.
Home Uncategorized इंदापूर तहसील कार्यालय समोरील रस्त्याची झाली चाळण, देशाच्या अर्थमंत्र्यांच्या दौऱ्यानिमीत्त होणार का...