इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या “त्या” दोन महिलांची अवसरीत जाऊन भेट घेत दिले प्रोत्साहन. वाचा सविस्तर.

👉 त्या महिलांची व्यवसायाप्रती जिद्द व चिकाटी ही समाजासाठी प्रेरणादायी- तहसीलदार
इंदापूर: कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी काल अवसरीमध्ये जाऊन गौरी शिंदे व दिपाली शिंदे या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. या दोन्ही महिलांच्या रोजच्या दिनक्रमाबद्दल माहिती घेऊन ते करत असलेल्या अपार मेहनतीचे कौतुकही केले.
जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने मागील तीन दिवसांपूर्वी गौरी शिंदे व दिपाली शिंदे यांची दुग्ध व्यवसायाची प्रेरणादायी बातमी लावली होती.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत त्यांनी हा दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि त्यात त्या नवदुर्गा यशस्वी झाल्या ,आणि हीच बातमी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी पाहिल्यानंतर तात्काळ त्यांनी आज अवसरीमध्ये येऊन शिंदे कुटुंबियांची भेट घेतली व दुग्ध व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती घेतली.एवढेच नव्हे तर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनीही दुग्ध व्यवसाय बद्दल शिंदे कुटुंब यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. 👉 अवसरीच्या दुग्ध व्यवसायाची प्रेरणादायी VEDIO बातमी पुढील लिंकवर- https://youtu.be/-lsItg2xU_o गौरी शिंदे व दिपाली शिंदे व्यावसाय करते वेळी वापरत असलेल्या पेंड,कडबा,इतर चारा औषधे याचीही सविस्तर माहिती घेतली. व कुटी मशीन,गाई,म्हशी,गोठा यांची त्यांनी पाहणी केली.

जवळपास दीड तास शिंदे कुटुंबासोबत त्यांनी दुग्ध व्यवसाय व शेती विषयक चर्चा केली .शिंदे कुटुंबांनी सुद्धा श्रीकांत पाटील यांचा हार श्रीफळ फेटा देऊन सन्मान केला.
यावेळी महिला उद्योजक गौरी शिंदे व दिपाली शिंदे म्हणाल्या की,”खुद्द तहसीलदार यांनी आमच्या व्यवसायाला भेट दिल्यामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा आणखी वाढली असून आम्हाला तहसीलदार साहेब आलेल्याचा अत्यंत आनंद झालेला आहे असे त्या महिला म्हणाल्या. एकंदरीत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेले तहसीलदार साहेब यांचा असाही शेतीप्रिय पैलू पाहायला मिळाल्याने सर्वत्र तहसीलदार साहेबांचे कौतुक होत आहे.यावेळी नितीन कांबळे ,बलभीम मिसाळ इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here