इंदापूरात पतंगाचा मांजा कापून चिमुकला गंभीर जखमी.बारामतीमध्ये मांजा विक्रेत्यावर कारवाई तर इंदापुरात नुसता सुळसुळाट…कारवाई का नाही? जनतेचा सवाल

काल दि. ती ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इंदापूर मध्ये पतंगाचा मांजा कापून अडीच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. नागपंचमी दिवशी मुले आनंदाने व उत्साहाने पतंग उडवतात पण त्या पतंगाला असणारा मांजा हा दोरा वापरणे अतिशय घातक आहे. काल इंदापूर मध्ये ही अशीच एक भयंकर घटना घडली आहे. मोटरसायकलवर जाणाऱ्या एका अडीच वर्षाच्या मुलाला अगदी गळ्याच्या जवळ हनुवटीला हा मांजा कापला गेला .जखम एवढी खोल झाली की त्या मुलाचा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला. त्या मुलाला सिरीयस परिस्थितीमध्ये तातडीने कदम हॉस्पिटल इंदापूरमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर ने सुद्धा क्षणाचाही विलंब न करता त्या बाळावर लगेच उपचार सुरू केले आणि त्या बाळाचा जीव वाचवला. तो मांजा जर गळ्यावर गेला असता तर जाग्यावरच त्या मुलाला धोका निर्माण झाला असता. मांजा किती धोकादायक ठरू शकतो हे अंगावर शहारे आणणारा कालचा इंदापूरमध्ये घडलेला प्रसंग होता. मग जनतेच्या मनात असा प्रश्न पडला आहे मांजा दोरा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर बारामतीमध्ये कारवाई होऊ शकते मग आपल्या इंदापूर मध्ये कारवाई का होऊ शकत नाही ?या बाबत इंदापूर मधील समाजसेवक तथा जेष्ठ पत्रकार समीर सय्यद यांनी दोन वर्षापासून याबाबत जनजागृती व प्रशासनास जागे करण्याचे काम करत आहेत परंतु इंदापुरातील धोकादायक मांजा विक्री बंद करण्यास प्रशासन यशस्वी होताना दिसत नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here