इंदापूरात आ.दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी निवड चाचणीच्या कुस्ती स्पर्धा.तालुक्यातील सुमारे 350 मल्लांचा सहभाग.

इंदापूर नगरपालिकेच्या मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी ६५ वे अधिवेशन नुकतेच पार पडले. निवड चाचणी स्पर्धा गादी गट व माती गट आशा दोन गटात पार पडल्या. स्पर्धेमध्ये एकूण साडेतीनशे कुस्तीगिरांनी सहभाग नोंदवला. कुस्ती स्पर्धा १४ किलो वजन गटापासून ते १३० कीलो पर्यंत गादी गट व माती गटात झाल्या. स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय अशा विजयी स्पर्धकांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्राँफी आणि ट्रँकसुट वितरण करून स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले तर राष्ट्रकुल स्पर्धेत अर्जुनवीर,सुवर्णपदक विजेता डीवायएसपी पै. राहुल आवारे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण भैय्या माने, इंदापूर नगरपालिकेच्या मा.नगराध्यक्षा अंकिता ताई शहा, भरतशेठ शहा, प्रदीप मामा जगदाळे, गटनेते कैलास कदम, नगरसेवक अमर गाडे, नगरसेवक स्वप्नील राऊत, नगरसेवक अनिकेत वाघ, श्री राहुल गुंडेकर, इंदापूर शहर दक्षता समितीचे मा.अध्यक्ष रमेश शिंदे, उपमहाराष्ट्र केसरी पै. असलम काझी, करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील, मल्ल सम्राट किताबाचे मानकरी रावसाहेब मगर उपस्थित होते.कुस्ती स्पर्धेचे आयोजन सरडेवाडीचे मा. उपसरपंच (ता. इंदापूर) पै. विजय मामा शिद आणि इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते पै. पोपट शिंदे यांनी केले.तालुका स्पर्धेमधून विजयी होणारे खेळाडूंची पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धे निवड करण्यात आली. इंदापूर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी पार पडल्या. उपाध्यक्ष राजेंद्र चोरमले, सचिव शरद झोळ, खजिनदार दत्तात्रय जाधव, इंदापूर तालुका तालीम संघाचे सर्व पदाधिकारी स्पर्धेसाठी उपस्थित होते. पै कमाल जमादार, सचिन बनकर, सचिन चांदणे, परशुराम करगळ, भारत जाधव तसेच कुस्तीप्रशिक्षक पै. नवनाथ तरंगे, पै. पांडुरंग राऊत, पै. सोनबा गिरी, पै. असलम मुलानी, पै अशोक चोरमले, पै शशिकांत सोनार, पै. हनुमंत पवार तर पंच म्हणून मोहन खोपडे, शरद झोळ, पप्पू कालेकर, निलेश मारणे, अनिल तरंगे, अशोक करे, सागर नरळे, सागर मारकड, अशोक बंडगर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कुस्तीशौकीन उपस्थित होते. आयोजक पै. विजयमामा शिद व पै. पोपट शिंदे यांनी चोख नियोजनासाठी सहकार्य केलेल्या सहकारी कार्यकर्ते आणि कुस्ती शौकिनांचे आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here