इंदापूरातील पुणे-सोलापूर हायवेवरील जलसा हॉटेल समोरील सीएनजी पंप बंद करा- शिवसेनेची मागणी.


आज इंदापूर पोलीस स्टेशनला शिवसेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवेदन शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटिका सीमा कल्याणकर व शहर प्रमुख अशोक देवकर यांनी दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की मागील काही दिवसापासून पुणे सोलापूर रोडवरील गजानन पेट्रोल पंप व सीएनजी पंप हे अपघाताचे ठिकाण बनलेले आहे. हायवे वर सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या गाड्या यांना पार्किंगची सोय नसल्याने राजरोसपणे हायवेवरच गाड्या पार्क केल्या जातात यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खरंतर सीएनजी पंप मालकाने गाड्यांसाठी सेपरेट लाईन करून त्यामध्ये सीएनजी भरण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे परंतु हायवेवरच गाड्या उभा राहिल्याने लांबच लांब रांग लागत आहे.
मागील काही दिवसात छोटे-मोठे अपघात तेथे झालेले आहेत व म्हणून भविष्यात धोका टाळण्यासाठी हा पंप बंद करावा अशा आशयाची मागणी शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख अशोक देवकर, जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर, महिला शहराध्यक्ष निर्मला जाधव, सोनू ढावरे यांनी केली आहे. आता या निवेदनावर इंदापूर पोलीस स्टेशन काय भूमिका घेईल व कशा पद्धतीने यातून मार्ग निघेल हे इंदापूरकरांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here