इंदापूरमध्ये रंगणार नवरात्री महोत्सव फेस्टिवल 2022: विरोधी पक्षनेते पोपट शिंदे यांच्या माध्यमातून महिलांना मिळणार एक हक्काचे व्यासपीठ.

उत्सव नवरात्रीचा…नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे. मधला पितृपंधरवडा त्या तयारीत कधी संपतो, समजतच नाही. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते.याच नवरात्रोत्सवामध्ये आनंद द्विगुणीत हवा यासाठी इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे यांनी इंदापूर तालुक्यातील खास महिलांसाठी एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी एक व्यासपीठ ठरणार आहे.दरवर्षीप्रमाणे नवरात्री महोत्सव फेस्टिवल 2022 चे आयोजन इंदापूरमध्ये केले असून दिनांक 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून संत सावतामाळी मंदिर परिसरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.दिनांक 1 ऑक्टोबर रोजी नवरात्र फेस्टिवलला प्रारंभ होणार असून प्रारंभीच्या वेळी रंगीलो इव्हेंट होणार असून यामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कलाकारांचा महाकार्यक्रम ‘रायझिंग स्टार ग्रुप’ च्या माध्यमातून मनोरंजनाचा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम संपूर्ण फॅमिली मित्रपरिवार व महिलांसाठी आयोजित केला आहे.त्याचप्रमाणे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दांडिया नाईट्स होणार असून यामध्ये सुप्रसिद्ध झी मराठी चॅनल वरील ‘देव माणूस’ सिरीयल फेम अस्मिता देशमुख व आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपट बलोच फेम प्रसाद सुर्वे व पुण्याची मैना फेम रोशनी काकडे व रायझिंग स्टार ग्रुप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दांडिया नाईट शो होणार आहे हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी व कपल्स साठी आयोजित केला असून आकर्षित बक्षीसही यावेळी देण्यात येणार आहेत.दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ‘होम मिनिस्टर’ च्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभ्यास व्यक्तिमत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुरस्कार प्राप्त मेघना झुझम यांच्या माध्यमातून इंदापूर क्वीन व होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला आहे याही कार्यक्रमाला आकर्षित बक्षीस ठेवण्यात आले आहेत.इंदापूर तालुक्याचा अभिमान व ज्या व्यक्तीने ‘गाडी घुंगराची’ हे गाणे व ‘बैलगाडा शर्यत’ हे गाणे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले असा इंदापुरातीलच नवयुवक ऋषिकेश काळे याचाही परफॉर्मन्स यावेळी आपल्याला पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे इंदापूर मधीलच स्टेरलिंग डान्स अकॅडमीच्या माध्यमातून ही आपले मनोरंजन यावेळी होणार आहे.बेस्ट दांडिया परफॉर्मन्स कपल्स परफॉर्मन्स, सोलो परफॉर्मन्सला वन डे टूर व्हीआयपी रिसॉर्टमध्ये पास मिळणार असून याचे नियोजन मुक्ताई ग्रुप इंदापूर मार्फत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे होम मिनिस्टर च्या प्रथम तीन विजेत्यांना पैठणीचा मानही मुक्ताई ग्रुपच्या मार्फतच होणार आहे. यावेळी मुक्ताई ग्रुपच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोकांना डिस्काउंट ओपन देऊन दुकानांमध्ये खरेदीसाठी सूटही मिळणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे यांच्या माध्यमातून होणार असून शोएब बागवान व राहुल गुंडेकर यांचे विशेष सहकार्य असणार आहे.त्यामुळे या हटके असलेल्या कार्यक्रमास शहराबरोबरच तालुक्यातील ही महिलांना याचा लाभ घेता येईल व या रंगीलो इव्हेंट नवरात्री फेस्टिवल 2022 च्या पास साठी खालील नंबर वर संपर्क करावा असेही आवाहन यावेळी राहुल गुंडेकर यांनी केले आहे. (फ्री पाससाठी संपर्क: 9075209209,8180088008)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here