इंदापूरमध्ये योगमय दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न.इंदापूरकरांची दिवाळी पहाट पतंजली परिवारांनी बनवली खास.

इंदापूर: इंदापूर शहरामध्ये दिवाळी सणानिमित्त कै.मंगेश(बाबा) वामनराव पाटील व कै.समाधान वसंतराव क्षिरसागर यांच्यार9 स्मरणार्थ पतंजली परिवारातर्फे संगीताच्या सुरेल तालावर योगमय दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. शारदा स्वरांजली प्रस्तुत गाण्याच्या सुरेल संगीत मैफिलीवर योग अभ्यास ही करण्यात आला.सध्याच्या धावपळीच्या युगात शरीर आणि मनाला स्वास्थ्य मिळणे खूप गरजेचे आहे. योगाने शरीर तर संगीताने मन सदृढ होते. त्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त पहाटेच्या रम्य वातावरणात गुलाबी थंडीमध्ये संगीत मैफिली सोबत शहरवासियांनी प्रशांत गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली योग अभ्यासाचाही आनंद घेतला. पिपल्स फाउंडेशन युवा ग्रुप यांचे वतीने मनमोहक रांगोळी काढून सुशोधन केले.यावरती दिव्यांची रोषणाई केल्यामुळे ब्रह्म मुहूर्ताच्या समयी ही आरास मनवेधक वाटत होती.
कार्यक्रमाची सुरुवात इंदापूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ माजी नगरसेवक शेखर पाटील पतंजली परिवाराचे प्रभारी जयकुमार शिंदे अॅड. विशाल चव्हाण ,मेघशाम पाटील,हमीदभाई आतार, शारदा नागपुरे सायराभाभी आतार जयश्री खबाले,मेघा भंडीरी या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.मान्यवरांनी यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्याचाही आनंद घेतला.या कार्यक्रमासाठी प्रा.पवन धुमाळ,प्रा.वीर सर, प्रकाश बलदोटा पतंजली परिवाराचे बिभिषण खबाले, मल्हारी गाडगे, सचिन पवार, रामेश्वर साठे ,भालचंद्र भोसले, काशिनाथ पारेकर ,शरद झोळ, शंकर काशीद ,किसन पवार, पियुष बोरा, सुनिल देवळालीकर, पिपल्स फाउंडेशनचे रोहित काळे, मंगेश घाडगे यांचे सह अनेक योग साधक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र परबत यांनी केलेे.आभार प्रदर्शन डॉ. संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी राधिका परिवारातर्फे उपस्थित सर्वांना दिवाळीच्या फराळाचा अल्पोपहार देण्यात आला.शांतिपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here