इंदापूरचे सिंघम म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांची तडकाफडकी बदली. बदलीचा निर्णय इंदापूरकरांना न आवडणारा.

इंदापूर: इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा अवैद्य कामगिरी करणाऱ्या लोकांच्या मुसक्या आवळण्यात माहीर असणारे दबंग अधिकारी टी.वाय. मुजावर यांची तडकाफडकी बदली झाल्याची अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. उद्यापासून इंदापूरला नवीन पोलीस निरीक्षक मिळणार असल्याचीही खात्रीदायक माहिती मिळाली खरंतर कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांची तडकाफडकी बदली ही इंदापूरकरांसाठी अतिशय धक्कादायक गोष्ट आहे कारण इंदापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये मुजावर साहेबांचा मोलाचा वाटा होता. प्रत्येक पक्ष त्याचप्रमाणे संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांची मने जिंकण्यात मुजावरसाहेब यशस्वी झालेले होते.इंदापूर येथे केलेल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये इंदापूर तालुक्याला पेट्रोलिंग म्हणजे काय? हेच मुजावर साहेबांनी आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिले होते. इंदापूर पोलिस स्टेशन हे पेट्रोलिंगच्या कामगिरीतून इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले होते. प्रत्येक गल्लोगल्ली व सर्व अंतर्गत नागरिक वस्ती तसेच दिवाळीच्या सीझनमध्ये व इतर सणावरात सर्व व्यापारी वर्गांच्या दारोदारी चालत जाऊन इंदापूर पोलिसांनी टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंगची उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे इंदापूर मधील सर्वसामान्य जनता इंदापूर पोलिस स्टेशनच्या कामावर समाधानी असल्याचे चित्र दिसून येत होते.. त्याचबरोबर इंदापूर पोलिस स्टेशनच्या ऑफिस परिसरातील साफसफाई ,स्वच्छता व रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने झाली असल्याने इंदापूर पोलिस स्टेशन हे एक सुसज्ज कार्यालय दिसत आहे एकूणच इंदापूर पोलीस हे इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले होते.पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत होती. गेल्या 5 महिन्यातच अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या 7 कारवाया याच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने केल्या असून यामध्ये आतापर्यंत तब्बल २ कोटी ८३ लाख रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत केला होता. सदर झालेल्या कारवाया या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाया समजल्या जातात.अनेक चोरी प्रकरणे उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत होते.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून झाला होता. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा वाहतूक नियंत्रण,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांची टीम यशस्वी झालेली दिसून आली होती.कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांची बदली झाल्याने इंदापूरकर मात्र पुरते नाराज होणार आहेत यात शंका नाही. अतिशय चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजवत असतानाही अशी तडकाफडकी बदली झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत व हा पोलीस प्रशासकीय निर्णय इंदापूरकरांना मात्र नक्कीच पटणारा नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here