इंदापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांची बदली थांबवा- विविध सामाजिक संघटनासह पत्रकारांची मागणी.

अवैद्य दारू,गुटखा,गोमांस,घरफोडी दरोडा इत्यादी विषयाचा झडा लावणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांची बदली रोखण्यासाठी इंदापूर शहरातूनच नव्हे तर इंदापूर तालुक्यातून विविध सामाजिक संघटना यांच्याबरोबरच आता काही पत्रकारही धावले आहेत. इंदापूर तालुक्यातील सुधाकर बोराटे,श्रीयश नलवडे, बाळासाहेब सुतार,पल्लवी चांदगुडे,प्रकाश आरडे, शिवाजी पवार, अतुल सोनकांबळे या पत्रकारांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना एक निवेदन दिलेले आहे. यापूर्वी तहसीलदार इंदापूर यांना इंदापूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी या बदलीला विरोध दर्शवला आहे यामध्ये आरपीआयचे इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, भटक्या विमुक्त जमाती संघटनाचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, लहुजी शक्ती सेनाचे दत्ताभाऊ जगताप, वडार पॅंथरचे अनिल अण्णा पवार, दलित स्वयंसेवक संघटना, घनश्याम निंबाळकर इत्यादी सामाजिक संघटनांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुजावरसो यांच्या बदलीचा विरोध केला आहे.
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,इंदापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हे इंदापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी रुजू झाल्यापासून तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तालुक्यात रात्री पेट्रोलींग चालु केल्यामुळे चोऱ्या, दरोडयाचे प्रकारावर आळा बसला आहे. तालुक्यात बेकायदेशीर व अवैध धंद्याचा कर्दनकाळ बनले आहेत. त्यामुळे अवैद्य धंद्याच्या लोकावर मोठी जरब बसली आहे. पोलीस निरीक्षक मुजावर हे दिनांक २८/०१/२०२१ रोजी रुजू झाल्यापासून गुन्हयांचे प्रमाण घटले आहे. तसेच दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पोलीस स्टेशन व कर्मचारी यांच्यात चांगल्या प्रकारे शिस्त लावली आहे. तसेच पोलीस खात्याची जनमानसामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम प्रमाणिकपणे केले आहे. पोलीस ठाण्यात येणारे सर्व सामान्य माणसामध्ये पोलीसांविषयी आदर व विश्वास फक्त मुजावर साहेबामुळे निर्माण झाला. परिनामी बहुतांश खेडयापाडयातील छोटया छोटया घटनामुळे होणारे वाद विवादाला पुर्णविराम मिळाल्याने होणारा पोलीस प्रशासना वरील ताण तर दूर झालाच आहे पण माणसा माणसामधील व जातीजातील वाद न होता सलोखा टिकला आहे.मुजावर साहेबांच्या कार्यकाळात अवैद्य धंद्यावरील कारवाया मोठया प्रमाणात झाल्या आहेत. त्यात दारू, गुटखा, गोमास, घरफोडी, दरोडा या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला आहे.ही सर्व जमेची बाजू असताना व अनेक सामाजिक संघटने बरोबर कायम सलोखा ठेवणारे राजकिय पदाधिकारी यशस्वी सुसंवाद असताना, अनेक मोर्चा, अंदोलन, उपोषण यापासून संबंधीतांना यशस्वीरित्या शांत करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे.अशा दिलदार मनाच्या सर्व सामान्य जनतेच्या मनामधील पोलीस हिरो मुजावर साहेब यांची करण्यात आलेली अन्यायकारक बदली का? व कशासाठी ? हि अन्यायकारक करण्यात आलेली बदली जरी प्रशासकिय बाब असली तरी उर्वरीत कालावधीसाठी पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांना इंदापूर पोलीस स्टेशन याठिकाणीच पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सोपविण्यात यावा ही विनंती आहे.
अशा आशयाचे पत्र पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना देण्यात आले आहे या पत्रावर सुधाकर बोराटे,श्रीयश नलवडे, बाळासाहेब सुतार,पल्लवी चांदगुडे,प्रकाश आरडे, शिवाजी पवार, अतुल सोनकांबळे यांच्या सह्या आहेत.आता वडार पॅंथर, पॅंथर सेना, शांतीसुर्य सोशल फाउंडेशन, वडार पॅंथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लहुजी शक्ती सेना, बहुजन क्रांती सेना, स्वाभिमानी लहुजी सेना, इंदापूर प्रेस क्लब (पत्रकार), दलित स्वयंसेवक संघ,भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना, महात्मा फुले ग्रुप इत्यादी संघटनांनी व पत्रकारांनी दिलेल्या या निवेदनानंतर पोलीस प्रशासन यावर काय निर्णय घेईल याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here