इंदापूरची ऐतिहासिक ओळख असलेले भार्गवराम तलाव व इंदापूरची वेस ची हेळसांड थांबवून ह्या वास्तू त्वरित दुरुस्ती व्हाव्यात- आर पी आय (A)

पडझड अवस्थेत असलेले ऐतिहासिक वास्तू म्हणजे इतिहासाचा अपमान- तालुकाध्यक्ष शिवराज पवार.

इंदापुर: आज इंदापूर शहरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट च्या कार्यकर्त्यांनी इंदापूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना भेटून भार्गवराम तलाव व इंदापूरची वेस दुरुस्ती संदर्भात निवेदन दिले हे निवेदन गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे पुष्प देऊन या कामाची त्वरित सुरुवात व्हावी अशी लक्षवेधी मागणी केली. सविस्तर वृत्त असे की आज आरपीआय (A) च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,ऐतिहासिक वास्तू असलेले इंदापूर शहराची वेस व तलावाचे १४ ऑक्टोबर २०२० च्या पावसात प्रचंड नुकसान झाले होते.या दोन्ही वास्तू इंदापूर च्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत ह्या दुरुस्तीचे काम खूप दिवसापासून पेंडिंग आहे व अद्यापही झालेली नाही.
 या दोन्ही वास्तू पडझड झालेल्या अवस्थेत असल्याने हा आपल्या मराठी इतिहासाचा एक प्रकारचा अपमान आहे म्हणून या दोन ऐतिहासिक वास्तू त्वरित दुरुस्त व्हाव्यात.त्याचप्रमाणे तलावावरून गेलेल्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून नुकसान झाले आहे व हा रस्ताही धोकेदायक बनलेला आहे. इंदापूर शहरातील वेशीचे सुद्धा पडझड झालेली आहे. दोन्ही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते व अपघात होण्याची शक्यता आहे. मागील एक वर्षांमध्ये शहरात विकासासाठी निधी आलेला आहे परंतु ह्या दरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.तरी धोकेदायक झालेला तलाव व गावची वेस प्राधान्याने दुरुस्त करा अशी आमची आरपीआय आंबेडकर गट या पक्षाची मागणी असून
आर पी आय (A) चे तालुकाध्यक्ष शिवराज पवार,शहराध्यक्ष अशोक देवकर, शहर उपाध्यक्ष योगेश गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेऊन पुढे असे म्हणाली आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या या मागणीची दखल न घेतल्यास संविधानिक पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन करण्याचाही इशारा या निवेदनाद्वारे देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात इंदापूरचे मुख्य अधिकारी यांच्याशी संवाद साधला असता ही दोन्ही कामे महत्वाचे असून प्रशासनाच्या स्तरावर ही दोन्ही कामे लवकरच पूर्ण होण्याबाबत इंदापूर नगरपालिका पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले.गेल्या वर्षापासून इंदापूर शहराची ओळख असलेले भार्गवराम तलाव व इंदापूरची वेस याची पडझड झालेल्या संदर्भात काँग्रेसने स्वप्निल सावंत यांच्या माध्यमातून निवेदन देऊन प्रशासनास ते काम त्वरित करावयास सांगितले होते परंतु या कामाला प्रशासनाने हातदेखील लावलेला नाही. आता हाच विषय आरपीआयने उचलून भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचे संकेतही दिले असल्याने हा विषय महत्त्वाचा बनला आहे हे निवेदन देतेवेळी मंगेश गार्डे,अजय गवळी,गणेश व्यवहारे,प्रतिक करे,अनिकेत आदलिंग,ऋषिकेश पवार,मिलिंद पवार,ईरफान शेख,राहुल देवकर,साजन ढावरे,सागर लोखंडे,ऋषिकेश लोखंडे,अखिल मोमीन इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here